एक्स्प्लोर

...म्हणून मोदींनी अमित शाहांना गृहमंत्री केले

अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालय दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. परंतु. एकेकाळी शेअर ब्रोकर असलेल्या अमित शाह यांनी राजकारणात आल्यापासून प्रत्येक निवडणूक जिंकत इथपर्यंतचा प्रवास केला आहे.

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएने बहुमत मिळवले. गुरुवारी एनडीएमधील सर्व कॅबिनेट तसेच राज्यमंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथदेखील घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर झाले. भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राजनाथ सिंह आणि निर्मला सीतारमण यांच्या मंत्रालयाचा खांदेपालट करण्यात आला आहे. राजनाथ सिंह संरक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळतील, तर निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुब्रह्मण्यम जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय सुपूर्द करण्यात आलं आहे. पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे, तर नितीन गडकरी यांच्याकडील भूपृष्ठ वाहतुकीची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. अमित शाह यांच्याकडे गृह मंत्रालय दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवाल्या आहेत. परंतु भाजपचे चाणक्य तसेच भाजपच्या वजीराची भूमिका निभवणारे अमित शाह यांचा प्रवास छोटा नाही. एकेकाळी शेअर ब्रोकर असलेल्या अमित शाह यांनी राजकारणात आल्यापासून प्रत्येक निवडणूक जिंकत इथपर्यंतचा प्रवास केला आहे. अमित शाह यांचा जन्म 1964 साली गुजरातमधल्या एका सधन कुटुंबात झाला. विद्यार्थी नेता म्हणून त्यांची राजकीय इनिंग सुरु झाली. १९८६ साली अहमदाबादमध्ये पहिल्यांदा त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर भेट झाली. त्यानंतर मोदी-शाह जोडीने हळूहळू गुजरातच्या राजकारणावरची पकड घट्ट केली. पाहा कोणतं खातं कोणाकडं? 1989 पासून अमित शाह यांनी 29 निवडणुका लढल्या आहेत. त्यापैकी एकाही निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला नाही. गुजरातच्या सारखेज विधानसभा मतदारसंघातून ते सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. विशेष म्हणजे एकाचवेळी 12 खाती सांभाळण्याचा त्यांना अनुभव आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून शाह यांनी दोन वेळा भाजपला लोकसभा निवडणूक जिंकून दिली आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदींनी लोकसभा काबीज केली. या राजकीय रणसंग्रामात मोदींचा उजवा हात म्हणून अमित शाह यांनी काम केले. अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हरयाणा, जम्मू-काश्मीर, झारखंड, गुजरात, त्रिपुरा आणि आसाम या राज्यातील विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. परंतु दिल्ली, बिहार, छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भाजपचे नवे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष कोण होणार? | नवी दिल्ली | ABP Majha 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
Baburao Chandore: अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानAmey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहितीPratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरेDnyaneshwari Munde  Mahadev Munde  खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
सुषमा अंधारे येताच माजी आमदाराने बैठक सोडली, खोचक प्रतिक्रिया; पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेत नाराजी?
Baburao Chandore: अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Embed widget