एक्स्प्लोर
साखर उत्पादकांना केंद्राकडून साडेआठ हजार कोटींचं पॅकेज
उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आल्याचं मानलं जात आहे.

नवी दिल्ली : साखर उत्पादकांसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखर उत्पादकांसाठी साडेआठ हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे.
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली.
30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे. या बफर स्टॉकचा साखर कारखान्यांमध्ये साठा करण्यात येणार असून त्या मोबदल्यात उत्पादकांना 11.75 कोटी देण्यात येतील. साखर कारखान्यांसाठी विक्री किंमत कमीत कमी 29 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभा पोटनिवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आल्याचं मानलं जात आहे.
दुसरीकडे, टपाल खात्यातील एक लाख 40 हजार कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचीही घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील ग्रामीण डाक सेवक 22 मेपासून संपावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बीड
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
