मोदी सरकारच्या नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांसह कामगार देशोधडीला लागतील; राहुल गांधींचा आरोप
नोटबंदी आणि जीएसटीच्या निर्णयाने ज्याप्रकारे लहान दुकानदार आणि व्यापारी देशोधडीला लागले. त्याप्रमाणे नव्या तीन कृषी कायद्याने शेतकरी आणि कामगार संपतील असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.
संगरूर (पंजाब) : ज्याप्रमाणे नोटबंदी आणि जीएसटीच्या कायद्याने लहान दुकानदारांना देशोधडीला लावले. त्याप्रमाणे मोदी सरकारने कृषीसंबंधी केलेल्या नविन तीन कायद्यांमुळे शेतकरी आणि कामगार देशोधडीला लागतील, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोंदींवर केला आहे. पंजाबमध्ये एका सभेला संबोधित करताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला देशावर कोरोनाचे संकट असताना सरकारने शेतकऱ्यांशी संबंधीत तीन नवे कायदे करताना घाई का केली असाही प्रश्न विचारला.
सरकारने ज्याप्रमाणे नोटबंदी आणि जीएसटीचा निर्णय घेवून लहान दुकानदार आणि मध्यम उद्योजकांना संपवले त्याचप्रमाणे आता हे तीन कृषी कायदे आणून शेतकऱ्यांच्या आणि कामगागांच्या गळ्याचा घोट घेतला जाईल, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधींनी अन्न वितरण आणि रेशनिंग व्यवस्थेच्या विकासाची गरज असल्याचे अधोरेखित केले आणि या व्यवस्थेत उणिवा असल्याचे अधोरेखित केले. या व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज असल्याचे आणि अजून मोठ्या संख्येने मंडींची निर्मीती करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. तसेच शेतकऱ्यांना हमीभाव आणि पायाभूत व्यवस्थेची उपलब्धता करून देणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
तीन कृषी सुधारणा कायदे देशातील कृषीक्षेत्राचे भविष्य पालटणार : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर
जर मोदींनी रेशनिंग व्यवस्था सुधारली आणि शेतकऱ्यांना योग्य हमीभाव दिला तर अंबानी आणि अदानी पैसा कमवू शकणार नाहीत, असा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी यांनी या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात राज्यभर ट्रॅक्टरच्या रॅलीमध्ये खेती बचावो यात्रा काढुन केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सभेला संबोधित करताना केंद्र सरकारवर टीका केली. या कायद्याला काळा कायदा असे संबोधताना त्यांनी याविरोधात राज्य सरकार लढा देईल आणि शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करेल असेही अमरिंदर सिंह म्हणाले.
काँग्रेस पंजाबचे जनरल सेक्रेटरी हरिष रावत, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल जाखर, मंत्री, बलबिर सिधू, विजय इंदर सिंघला, राणा गुरमित सोधी आणि राज्यसभा खासदार दिपेंदर हूडा याप्रसंगी उपस्थित होते. आमदार आणि माजी मंत्री नवज्योत सिध्दू यावेळी अनुपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यांनी शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क व सुरक्षा) किंमत हमी व कृषी सेवा करार व अत्यावश्यक सेवा (सुधारणा) विधेयक या तीन करारांना मान्यता दिली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून राहुल गांधी यांची खिल्ली उडवणारं वक्तव्य