एक्स्प्लोर

सध्या 'अफवा' हेच सुरक्षा दलांसमोरचं सर्वात मोठं आव्हान : लष्कर प्रमुख रावत

सध्या 'अफवा' हेच सुरक्षा दलांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं भारतीय लष्कराचे प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले.

नवी दिल्ली : सध्याच्या वातावरणात 'अफवा' हेच सुरक्षा दलांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपिन रावत म्हणाले. सोबतच यामध्ये माध्यमांची महत्वाची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. नागरिकत्व सुधारीत कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन देशात ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. यामध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्याही घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रावत यांनी हे विधान केलं आहे. नागरिकत्व सुधारीत कायदा आणि राष्ट्रीय नागरीक नोंदणीवरुन सुरुवातीला ईशान्य भारत पेटला. ही आग राजधानी दिल्लीत पोहचली. दिल्लीतील जामिया विद्यापीठात घडलेल्या हिंसाचारामुळे ही आग आता उत्तर भारतासह देशभर पोहचत आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरुन या कायद्याचा विरोध करत आहेत. यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अफवा, चुकीच्या माहितीमुळे ही आंदोलने आणखी चिघळली जाण्याची चिन्ह आहेत. त्यामुळेच सध्याच्या वातावरणात 'चुकीची माहिती' हे सुरक्षा दलांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं मत भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी व्यक्त केलं आहे. सोबतच माध्यमांची देखील यामध्ये महत्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर भारतात तीव्रता जास्त - सीएएच्या विरोधात काल गुरुवारी लखौनमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तर, आज मेरठमध्ये आंदोलकांनी पोलिस ठाणे पेटवल्याचीही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात लखौनसह अनेक जिल्ह्यांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. त्यानंतरही अनेक जिल्ह्यांत आज पुन्हा हिंसक आंदोलने झाली. यात पाच जण ठार झाले आहेत. फिरोझाबादसह गोरखपूर, मेरठ, गाझियाबाद, हापुड, बहराइच, बलरामपूर, मुझफ्फरनगर, बिजनौर, गोरखपूर, कानपूर, उन्नाव, भदोही तसेच गोंडा येथे हिंसक निदर्शने झाली. महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी आंदोलने - विना नेता आणि विना झेंडा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आंदोलन आणि निषेध मोर्चे निघाले. औरंगाबादेत एमआयएमचा विराट मोर्चा निघाला. हातात तिरंगा घेऊन मुस्लीम समाजानं नागरिकत्व कायदा आणि एनआरसीला तीव्र विरोध दर्शवला. तिकडे नागपूर आणि ठाण्यात नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम समाजानं आंदोलनाला सुरूवात केली. मशिदींमध्ये हजारोंच्या संख्येनं मोर्चेकरी जमले. नागपुरातील चिटणीस पार्कसमोरी ईदु मियाँ मशिदीबाहेर जवळपास एक तासापासून आंदोलन सुरू आहे. ठाण्यातील राबोडीत मुस्लिम समाजानं मोर्चा निघाला. याशिवाय पुण्यातही मुस्लिम समाजाकडून आंदोलनाला सुरूवात झाली आहे. एकीकडे शांततेत आंदोलन सुरु असताना दुसरीकडे बीड आणि जालन्यात मोर्चाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले. हेही वाचा - नागरिकत्व कायद्यावरून गैरसमज नको, राज्यातील सर्वधर्मियांच्या हक्कांचं संरक्षण करणार : मुख्यमंत्री Citizenship Act | नागरिकत्व कायदा मुस्लिमविरोधी नाही : अभाविप | सोलापूर | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Sameer Wankhede on Tukaram Mundhe: बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
बेधडक तुकाराम मुंढेंच्या धडाडीने अवघ्या देशात चर्चा, पण समीर वानखेडेंच्या प्रतिक्रियेनं सर्वांच्याच भूवया उंचावल्या! नेमकं म्हणाले तरी काय
Ganesh Naik: डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
डेटा सेंटरला वीज, पाणी लागतं, नॉइज पोल्युशन होतं, डेटा सेंटर हवं, पंतप्रधानांनी सांगितलं पण या सेंटरला माझा वैयक्तिक विरोध, गणेश नाईक नेमकं काय म्हणाले?
Embed widget