एक्स्प्लोर

पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल, प्रक्रिया अधिक सोपी!

नवी दिल्ली : भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आणि सहज झाली आहे. विशेषत: जन्म तारखेवरील वादावरुन अनेकदा पासपोर्ट मिळण्यास अडचणी निर्माण होतात. मात्र, परराष्ट्र खात्याने जाहीर केलेल्या नव्या नियमांमुळे पासपोर्ट मिळण्यास अधिक सोपं जाणार आहे. जन्म तारखेसंदर्भातील बदल : पासपोर्ट नियम, 1980 नुसार, 26 जानेवारी 1989 या दिवशी किंवा या दिवसानंतर ज्यांचा जन्म झाला असेल, त्यांना पासपोर्टसाठी जन्म दाखला सादर करणं बंधनकारक होतं. मात्र, नियमांमधील नव्या बदलानुसार, आता परराष्ट्र खात्याने आणखी काही पर्याय दिले आहेत, ज्यामुळे जन्म दाखल्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल. जन्म तारखेचा पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतंही एक कागदपत्र पासपोर्टसाठी अर्ज करताना अर्जदार सादर करु शकतात :
  1. महापालिका किंवा इतर सरकारी संस्थेमार्फत दिलेला जन्म दाखला.
  2. शाळा सोडल्याचा दाखला, स्थलांतर प्रमाणपत्र जन्म तारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. मात्र, प्रमाणपत्र देणारी शिक्षण संस्था शासन मान्यताप्राप्त असायला हवी.
  3. पॅन कार्ड
  4. आधार कार्ड/ई-आधार कार्ड
  5. सर्व्हिस रेकॉर्ड (सरकारी नोकरदारांसाठी) किंवा पे पेन्शन ऑर्डर (निवृत्त सरकारी नोकरदार). मात्र, हे कागदपत्र संबंधित संस्थेतील अधिकृत व्यक्तींकडून अटेस्टेड करुन घेणं गरजेचं असेल.
  6. ड्रायव्हिंग लायसन्स
  7. मतदान ओळखपत्र
  8. एलआयसी पॉलिसी बाँड
  पासपोर्ट बनवण्यासंदर्भात इतर महत्त्वाचे बदल : आई-वडिलांचं नाव, अनाथ मुलं, कुमारी माता इत्यादींसंदर्भातही परराष्ट्र खात्याने पासपोर्टच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. विशेषत: अनाथालयातील मुलांना याआधी पासपोर्ट बनवण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असे. मात्र, नव्या नियमांनंतर त्यांनाही पासपोर्ट बनवण्याची प्रक्रिया सोपी जाणार आहे.
  1. पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी यापुढे अर्जदार आपल्या नावासह आई किंवा वडील किंवा पालकांचं नाव देता येईल. म्हणजेच यातील कुणाही एकाचं नावही यापुढे ग्राह्य धरलं जाईल, आई-वडील अशा दोघांचीही नावं देण्याची गरज पडणार नाही. सिंगल पॅरेंट्स असलेल्यांना या बदललेल्या नियमाचा मोठा फायदा होणार आहे.
 
  1. पासपोर्टसाठी याआधी 15 अॅनेक्सेस असायचे, ते आता 15 वरुन 9 वर आणले आहेत. अॅनेक्सेस A, C, D, E, J आणि K काढून टाकण्यात आले आहेत.
 
  1. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढे कोणतंही अॅनेक्सेस अटेस्टेटड, शपथपत्र, नोटरी करुन देण्याची गरज नाही. सर्व अॅनेक्सेस अर्जदार स्वत: प्लेन पेपरवर लिहून पासपोर्टसाठी सादर करु शकतो.
 
  1. अर्जदाराला यापुढे अॅनेक्सेर K किंवा कोणतंही विवाह प्रमाणपत्र सादर करावं लागणार नाही.
 
  1. जर अर्जदार घटस्फोटित असेल, तर त्याला आपल्या घटस्फोटित पती किंवा पत्नीचं नाव देण्याची गरज नाही. किंबहुना, घटस्फोटत प्रमाणपत्रही सादर करण्याची गरज नाही.
 
  1. अनाथ व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाचे बदल परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये केले आहेत. पासपोर्टसाठी अर्ज करताना अनाथ व्यक्तींना आपला जन्मदाखला सादर करण्याची गरज नाही. मात्र, अनाथालयाच्या मुख्य व्यक्तीचं त्यासंबंधी पत्र अर्जासोबत जोडावं लागेल.
 
  1. दत्तक घेतलेल्या मुलांनाही पासपोर्टसाठी अर्ज करणं सोपं जाईल. दत्तक घेतल्याचं प्रमाणपत्र सादर न करता, ज्यांनी दत्तक घेतलं आहे, त्यांच्याकडून पत्र अर्जासोबत जोडावं लागेल.
 
  1. साधू, संन्यासी यांना पासपोर्टसाठी अर्ज करायचा असल्यास, ते पालकांच्या जागी आपल्या अध्यत्मिक गुरुचं नाव देऊ शकतात.
 
  1. सरकारी नोकरीत असलेल्यांना आता शासकीय सेवेत असल्याचं ओळख प्रमाणपत्र किंवा एनओसी न मिळाल्यास पासपोर्ट बनवण्यात अडथळे येणार नाहीत. कारण अॅनेक्सर- ‘N’ मध्ये अर्जराद स्वत: पत्र लिहून अर्जासोबत जोडू शकतो. या बदलामुळे आता तातडीने पासपोर्ट हवा असल्यास सरकारी नोकरीत असलेल्यांना अडचणी येणार नाहीत.
 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
देशात NEET घोटाळा, CBSEचा तमाशा सुरु असतानाच दिल्लीतील स्कूल ऑफ प्लॅनिंगच्या इमारतीत आगीचा भडका; कार्यालयातील आग संशयास्पद असल्याचा काँग्रेसचा आरोप
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं

व्हिडीओ

Pune Vidhan Parishad : काकडेंच्या एन्ट्रीने टिंगरेंना धक्का? NCP तील नाराजीनाट्य | Special Report
Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
Embed widget