एक्स्प्लोर
Advertisement
जिवंत मुलाला मृत घोषित करणाऱ्या हॉस्पिटलचं लायसन्स रद्द
जोपर्यंत डॉक्टरांना अटक केली जात नाही, तोपर्यंत चिमुकल्याच्या मृतदेहाला हात लावणार नाही, असा पवित्रा चिमुकल्याच्या वडिलांनी घेतला आहे.
नवी दिल्ली : जिवंत चिमुकल्याला मृत घोषित करणाऱ्या मॅक्स हॉस्पिटलवर अखेर दिल्ली सरकारने कारवाई केली आहे. शालीमार स्थित मॅक्स हॉस्पिटलचं लायसन्स रद्द करण्यात आले आहे. जिवंत चिमुकल्याला मृत घोषित केल्याप्रकरणी मॅक्स हॉस्पिटल दोषी असल्याचे समोर आले आहे.
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी मॅक्स हॉस्पिटलचं लायसन्स रद्द करण्याची घोषणा केली. सत्येंद्र जैन म्हणाले, "मॅक्स हॉस्पिटलला याआधीही नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. हॉस्पिटल दोषी असल्याचे आढळले आहे. हॉस्पिटल प्रशासनही दोषी आहे."
मॅक्स हॉस्पिटल हे ढिसाळ कारभारात सराईत असल्याचे दिल्ली सरकारने म्हटले आहे. शिवाय, या हॉस्पिटलमध्ये कोणताही रुग्ण भरती केला जाऊ नये, असेही दिल्ली सरकारने आदेश दिले आहेत.
जोपर्यंत डॉक्टरांना अटक केली जात नाही, तोपर्यंत चिमुकल्याच्या मृतदेहाला हात लावणार नाही, असा पवित्रा चिमुकल्याच्या वडिलांनी घेतला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
बीड
महाराष्ट्र
Advertisement