एक्स्प्लोर

जेएनयूत रविवारी रात्र काय झालं? मास्कधारी गुंडांचा मुलींच्या वसतीगृहात हैदोस

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अनेक विद्यार्थ्यांवर काल (रविवार)रात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जवळपास 20 विद्यार्थांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही गुंडानी वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. तोंड बांधलेल्या या गुंडांनी लाठ्या-काठ्या आणि लोखंडी सळईने मुलींवरही हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोष गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. जेएनयू विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. दोन मिनीट 10 सेकंदच्या या व्हिडीओत मुलींच्या वसतीगृहात तोंडाला बांधलेले गुंड तोडफोड आणि धिंगाणा घालताना दिसत आहेत. वसतीगृहात मुली आक्रोश करतायेत. एक तोंडाला बांधलेला गुंड मुलींना धमकावण्याच प्रयत्न करताना दिसत आहे. या सर्वच गुंडांकडे लाठ्या, काठ्या आणि लोखंडी सळई होत्या. विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षासह 20 जण रुग्णालयात - हल्ल्याचा हा व्हिडीओ जेएनयूच्या साबरमती वसतीगृहाचा असून यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोषवरही जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात तिचं डोकं फुटलं असून ती गंभीर जखमी झाली आहे. गंभीर जखमी झालेल्या आईशासह अन्य 20 विद्यार्थ्यांना उपचारासाठी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यता आले आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाली आहे. फी वाढीवरुन घटना घडल्याची माहिती -  ही घटना विद्यापीठातील फी वाढीच्या मुद्द्यावरुन झाल्याचे बोलले जात आहे. ज्यावेळी विद्यार्थ्यांचे दोन गट आपापसात भिडले. त्यावेळी प्राध्यापकही तिथे उपस्थित होते. त्यांनाही यात मारहाण झाली आहे. एक गट फी वाढीचा विरोध करत होता, तर दुसरा गट विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यासाठी आग्रही होता. याच मुद्द्यावरुन दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला. ज्याचे पर्यवर्सन नंतर मारहाणीत झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विद्यापीठात झालेल्या हल्ल्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. डाव्या संघटना आणि एभीवीपी ऐकमेकांवर आरोप करत आहेत. घटनाक्रम - सायंकाळी 4 वाजता : साबरमती वसतीगृहाच्या टी प्वाइंट येथील छात्रसंघ भवन येथे सभा सुरू होती. 5 वाजता : सभेदरम्यान एबीवीपीचे कार्यकर्ते आणि छात्रसंघाच्या विद्यार्थ्यांमध्ये वादावादी, परिसरात तणाव 6 वाजता : मारहाणी विरोधात छात्र संघटनेकडून रॅलीचे आयोजन, दोन्हीबाजूने दगडफेक 6:20 वाजता : मास्कधारी गुडांचा हल्ला - रात्री 8:10 वाजता : पोलिस घटनास्थळी दाखल 9:15 वाजता : पोलिस मुख्यालयाच्या जवळ जामिया विद्यार्थ्यांचा हल्लेखारांविरोधात कारवाईसाठी आंदोलन रात्री 10 वाजता : पोलीसांचा विद्यापीठ परिसरात ध्वज मार्च रात्री 12 वाजता : समर्थक विद्यापीठ परिसरात दाखल होण्यास सुरुवात. हल्ल्याचा बॉलिवूडमधून निषेध - या हल्ल्यात 20 जण जखमी झाले असून त्यांच्या एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहे. जेएनयूमधील हल्ल्यावर बॉलिवूडमधूनही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अभिनेता रितेश देशमुख, अभिनेत्री स्वरा भास्कर, तापसी पन्नूसह अनेक कलाकारांनी ट्वीट करुन या घटनेचा निषेध केला आहे. संबंधित बातम्या - JNU Attack | जेएनयू हल्ल्याचा रितेश, स्वरा, अनुराग कश्यपसह बॉलिवूड सेलिब्रिटींकडून निषेध जेएनयू विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचे देशभर पडसाद; मुंबई, पुण्यात विद्यार्थ्यांची निदर्शने छात्रसंघाच्या अध्यक्षासह विद्यार्थी, प्राध्यापकांना मारहाण, केजरीवाल, राहुल गांधीचं सरकारवर टीकास्त्र JNU Attack | जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबई आयआयटीतील विद्यार्थ्यांची निदर्शने | मुंबई | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! देशभरात होणाऱ्या जनगणनेच्या तारखा जाहीर, सरकार ऑनलाइन पोर्टल सुरु करणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
मोठी बातमी! देशभरात होणाऱ्या जनगणनेच्या तारखा जाहीर, सरकार ऑनलाइन पोर्टल सुरु करणार, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
मृत्यूलाही भीडला पण नाद नाही सोडला! सायकलवरुन फिरला 191 देश, 2 लाख किलोमीटरचा प्रवास, 19 वर्षे जगभर भ्रमंती
मृत्यूलाही भीडला पण नाद नाही सोडला! सायकलवरुन फिरला 191 देश, 2 लाख किलोमीटरचा प्रवास, 19 वर्षे जगभर भ्रमंती
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Somnath Temple: सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार
सोमनाथ मंदिराजवळ मांसाहार विक्रीवर बंदी नाही, गुजरात उच्च न्यायालयाने सरकारी बंदी उठवली; अधिकारांचा गैरवापर केल्याचं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांना फटकार

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget