एक्स्प्लोर
लग्नासाठी पाच लाखांवर खर्च केल्यास गरिबांना 10 टक्के रक्कम द्यावी लागणार!
नवी दिल्ली : लग्नसमारंभासाठी शाही खर्च करणाऱ्यांना यापुढे चाप लागण्याची शक्यता आहे. शाही लग्नांमध्ये आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करणाऱ्यांना आता सामाजिक कार्यासाठी आपला हातभार लावावा लागणार आहे. यासंदर्भात लवकरच लोकसभेत विधेयक मांडलं जाणार आहे.
लग्नसमारंभात पाच लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम खर्च केल्यास त्या रकमेच्या 10 टक्के रक्कम ही गरीब मुलींच्या लग्नासाठी द्यावी लागणार आहे. लोकसभेच्या आगामी सत्रात काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांच्याकडून (Compulsory Registration and Prevention of Wasteful Expenditure) Bill, 2016 हे विधेयक मांडलं जाईल. या विधेयकात लग्नामध्ये करण्यात येणाऱ्या वायफळ खर्चावर बोट ठेवत गरजूंना काही रक्कम देणं बंधनकारक केलं जाणार आहे.
लग्नसोहळ्यात होण्याऱ्या ओंगळवाण्या प्रदर्शनाला आळा घालण्यासाठी हे विधेयक आणलं जाणार आहे. सोबतच लग्नात पाहुण्यांची संख्या, तसंच पदार्थांच्या संख्येवरही निर्बंध घातले जाऊ शकतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement