(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mark Zuckerberg : Meta कंपनी प्रथमच नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती थांबवणार, जुन्या कर्मचाऱ्यांची होणार कपात, मार्क झुकरबर्ग यांची घोषणा
Mark Zuckerberg : यापूर्वी Facebook म्हणून ओळखली जाणारी मेटा कंपनी त्यांच्या कंपनीतील कर्मचारी कमी करण्याचा विचार करत आहे.
Mark Zuckerberg : Facebook आणि Instagram चे मालक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी प्रथमच मेटा कंपनी (Meta Company) कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणार असल्याचे सांगितले. तसेच नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती थांबवणार असल्याचे झुकरबर्ग म्हणाले. यापूर्वी Facebook म्हणून ओळखली जाणारी मेटा कंपनी (Meta Company) त्यांच्या कंपनीतील कर्मचारी कमी करण्याचा विचार करत आहे. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी कंपनीतील काही टीमची नियुक्ती फ्रीज करण्याची तसेच त्यांची पुनर्रचना करण्याच्या योजनांची घोषणा केली.
Facebook च्या स्थापनेनंतरचे पहिले मोठे बजेट फेरबदल
2004 मध्ये Facebook च्या स्थापनेनंतरचे पहिले मोठे बजेट फेरबदल काय असेल, असा प्रश्न विचारताच झुकरबर्ग म्हणाले की, कंपनी खर्च कमी करण्यासाठी आणि पुन्हा फोकस करण्यासाठी काही टीमची नियुक्ती आणि पुनर्रचना करेल. या वर्षाच्या तुलनेत 2023 मध्ये मेटाची कर्मचाऱ्यांची संख्या लहान होण्याची शक्यता आहे, झुकरबर्ग म्हणाले, यांनी कर्मचाऱ्यांसोबत साप्ताहिक प्रश्नोत्तर सत्रादरम्यान एम्प्लॉयी फ्रीजची घोषणा केली. ते म्हणाले की, मेटा एजन्सी बहुतेक टीमचे बजेट कमी करेल,
शेअर्स 60 टक्क्यांनी घसरले
झुकरबर्ग म्हणाले, "मला अपेक्षा होती की अर्थव्यवस्था आता अधिक स्थिर होईल, परंतु आपण जे पाहत आहोत त्यावरून ते अजूनही दिसत नाही, म्हणून आम्ही ही योजना करू इच्छितो. मेटा स्टॉक, जो दिवसाच्या सुरुवातीस आधीच ट्रेडिंग करत होता, बुधवारच्या बंदच्या तुलनेत 3.7% खाली आणखी घसरला. या वर्षी आतापर्यंत शेअर्स 60 टक्क्यांनी घसरले आहेत.
मेटामध्ये 30 जूनपर्यंत 83,500 पेक्षा जास्त कर्मचारी होते
भविष्यात कर्मचारी कपात आणि नियुक्ती थांबवणे ही मेटा ची सर्वात मोठी कारवाई असणार आहे. युझर्सचे लक्ष वेधण्यासाठी वाढत्या स्पर्धेमुळे जाहिरातीतील महसूल वाढ मंद होत आहे. त्यामुळे आर्थिक दबावा वाढतोय, Apple Inc च्या नवीन गोपनीयता निर्बंधांमुळे अडचणी येत आहेत. टिकटॉक तरुण युजर्सला इंस्टाग्रामपासून दूर आकर्षित करत आहे. मेटाने या वर्षाच्या सुरुवातीला सांगितले की, यंदा कर्मचारी कपात आणि इंटर्नसाठी पूर्ण-वेळ नोकरीची नियुक्ती निलंबित करण्याची योजना आहे. झुकरबर्गने स्पष्ट केले. झुकरबर्गने जुलैमध्ये इशारा दिला होता की, META "हळूहळू हेडकाउंट वाढ कमी करेल" आणि नव कर्मचाऱ्यांची नियुक्ती थांबवेल, मेटामध्ये 30 जूनपर्यंत 83,500 पेक्षा जास्त कर्मचारी होते आणि दुसऱ्या तिमाहीत 5,700 नवीन कर्मचारी जोडले गेले.