Manipur Violence: मणिपूरमधील इंफाळ विमानतळ बंद, हवाई क्षेत्रात दिसले अज्ञात ड्रोन
Manipur Violence: इंफाळ विमानतळाच्या हवाई क्षेत्रात अज्ञात ड्रोनची हालचाल आढळल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. येणारी उड्डाणे इतर गंतव्यस्थानांकडे वळवण्यात आली आहेत.
मुंबई : मणिपूरची (Manipur) राजधानी इंफाळमधील (Imphal) बीर टिकेंद्रजीत आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई क्षेत्रात एक अज्ञात मानवरहित ड्रोन (Drone) आढळल्यानंतर सर्व उड्डाणं थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रविवारी (19 नोव्हेंबर) दुपारी 2.30 वाजता या भागात हे ड्रोन आढळून आल्याची माहिती देण्यात आलीये. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सूत्रांनी सांगितले की, इंफाळला जाणारी आणि जाणारी काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे इंफाळकडे येणारी काही उड्डाणं हवाईक्षेत्रातून माघारी फिरली. त्याचप्रमाणे ही उड्डाणं इतर विमानतळांच्या दिशेने वळवण्यात आली.
Eastern Air Command IAF tweets, "IAF activated its Air Defence response mechanism based on visual inputs from Imphal airport. The small object was not seen thereafter." https://t.co/wRO6Kvh7fU pic.twitter.com/E2DwO4oM4v
— ANI (@ANI) November 19, 2023
इंटरनेट सेवा 23 नोव्हेंबरपर्यंत बंद
मणिपूरची सध्या कायदा आणि सुव्यवस्थेची अवस्था फारशी चांगली नाही. त्याच पार्श्वभूमीवर मणिपूरच्या सरकारने 23 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच पुढील 5 दिवस इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. सरकारने घेतलेल्या याच निर्णयानंतर हे अज्ञात ड्रोन आढळून आले.
आतापर्यंत जातीय संघर्षामध्ये 200 जणांचा मृत्यू
मणिपूरमध्ये कुक्की आणि मैतई समाजामध्ये मागील अनेक महिन्यांपासून जातीय संघर्ष सुरु आहे. मे महिन्यापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराचे सत्र सुरु आहे. आतापर्यंत या संघर्षामध्ये जवळपास 200 जणांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
आसाम रायफल्सच्या जवानांवर 16 नोव्हेंबर रोजी झाला होता हल्ला
मणिपूरमध्ये गस्तीवर असलेल्या आसाम रायफल्सच्या जवानांवर गेल्या गुरुवारी म्हणजेच 16 नोव्हेंबर हल्ला करण्यात आला होता. तिरेक्यांनी यापूर्वी इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाईस (आयईडी) पेरून हा स्फोट घडवून आणला होता. त्यानंतर आसाम रायफल्सच्या तुकडीवर हल्ला करण्यात आला.
राज्यातील तेंगानोपाल जिल्ह्यातील सायबोल भागात दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. भारतीय लष्कराच्या आसाम रायफल्सचे सैनिक नियमित गस्तीवर असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
A drone that was very small in appearance was spotted by security personnel at Imphal Airport on Sunday at 3 pm. An alert was issued to other agencies at the airport and operations were postponed till security clearance. Three flights were affected due to the security clearance.…
— ANI (@ANI) November 19, 2023