एक्स्प्लोर

Manipur Violence : केंद्राने मनात आणलं असतं तर तीन दिवसात मणिपूरचा प्रश्न सुटला असता.., मणिपूरचा मराठी माणूस सांगतोय ग्राऊंड रिपोर्ट

Manipur Ground Report : मणिपूरचा हिंसाचार हा सुनियोजित असून म्यानमारमधून आलेल्या लोकांमुळे मणिपूर अस्वस्थ असल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं.

Manipur Violence : केंद्राच्या मनात आलं असतं तर मणिपूरचा प्रश्न तीन दिवसात सुटला असता, पण केंद्राने तसं केलं नाही, राज्यानेही केंद्राचीच भूमिका कायम ठेवली... हा आरोप केलाय मणिपूरमधील मराठी माणसाने. मणिपूर हिंसाचार ज्यांनी जवळून पाहिलाय ते जीवन अभिराम लिंगथो उर्फ जीवन सिंह यांनी एपीबी माझाशी बोलताना सांगितलं की, या ठिकाणचा हिंसाचार हा सुनियोजित आहे. 

जीवन सिंह यांनी 20 वर्षे पुण्यामध्ये वास्तव्य केलं. त्यामुळे ते उत्तम मराठी बोलतात. मणिपूरमध्ये हिंसाचार झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणचा ग्राऊंड रिपोर्ट सांगितला. 

कुकी लोकांनी मैतेई लोकांवर अत्याचार केल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. एका खोलीत अनेकांना बंद केलं आणि त्या खोलीत मिर्च्या जाळून त्यांना ठार करण्यात आल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. अनेकांची घरं जाळण्यात आली. घरातून कुठे पळायचं हे अनेक महिलांना सूचलं नाही. त्यामध्ये अनेक गरोदर महिलांचा समावेश होता. 

मणिपूर हिंसाचारानंतर त्यातून वाचलेल्या नागरिकांची रिलिफ कॅंपमध्ये सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये 32 नवजात बालके आहेत, जी काहीच दिवसांपूर्वी जन्मलेली आहेत. याविषयी बोलताना जीवन सिंह म्हणाले की, या ठिकाणी असलेल्या अनेक जणांची घरं जाळण्यात आली, त्यांनी भीतीने घाबरून घर सोडलं. या ठिकाणी अनेक महिला आणि त्यांची मुलं आश्रयाला आहेत. या ठिकाणी असलेल्या महिलांचे पती एक तर गावीच स्वतःच्या घरांच्या रक्षणासाठी थांबले आहेत किंवा इतर ठिकाणी कँपमध्ये आहेत. 

मणिपूरची लोकं ही सर्वांना सामावून घेणारी आहेत असं सांगत ते म्हणाले की, मणिपूरमध्ये सध्या असलेला तणाव हा म्यानमारमधून आलेल्या लोकांमुळे निर्माण झाला आहे. मणिपूर सरकार आता कमकुवत झालं आहे, आता सर्व काही देवावर असून त्याच्याकडे नजरा लावून बसलो आहे. केंद्र सरकारने मनात आणलं असतं तर तीन दिवसात हा प्रश्न संपवला असता पण त्यांनी तसं केलं नाही आणि राज्य सरकारने केंद्राची भूमिका सुरू ठेवून हा प्रश्न मिटवला नाही. 

मणिपूरची लोकसंख्या ही 28 लाख इतकी आहे. त्यामध्ये 60 टक्के लोकसंख्या ही मैतेई समूदायाची आहे. त्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे अधिक आहे. कुकी आणि नागा लोकं ही बहुतांशी ख्रिश्चन आहेत आणि मैतेई लोकं ही हिंदू समूदायाची आहेत. त्यांच्यातील हा वाद असल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. या ठिकाणची भूमी ही जवळपास 91 टक्के पर्वतीय आहे, उर्वरित भाग हा दऱ्यांचा आहे. या 9 टक्के जागेवर जास्तीत जास्त मणिपुरी लोक राहतात. 

मणिपूर दंगलीमुळे या ठिकाणच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. रिलीफ कँपमध्ये किंवा त्याच्या जवळपास त्यांच्या शिक्षणाची सोय तात्पुरत्या स्वरुपात केली आहे. या ठिकाणी नीटची तयारी करत असलेली मुलगी ही 6 जूनपासून गायब आहे. ती कुठे गेली, तिचं काय झालं हे अद्याप कुणालाही माहिती नाही. 

ही बातमी वाचा: 

 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
नाद केला पण वाया नाही गेला! 12 वर्षांची मेहनत, तब्बल 40 परीक्षांमध्ये अपयश, संघर्षातून घडलेल्या मनोजची यशोगाथा 
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण
जगातील सगळ्यात हलकं हेल्मेट! वजन फक्त 1050 ग्रॅम, सुरक्षेच्या बाबतीत मजबूत, शानदार कार्यक्रमात अनावरण

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Embed widget