(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manipur Violence : 'मणिपूरची परिस्थिती लीबिया, सीरियासारखी', माजी लेफ्ट.जनरल निशिकांत सिंह यांचं ट्वीट; माजी लष्करप्रमुख सरकारला म्हणाले...
Manipur Violence: मणिपूरमध्ये मे महिन्यात सुरु झालेलं हिंसाचाराचं सत्र अजूनही कायम आहे. तर दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री आर के रंजन यांच्या घरावर देखील हल्ला करण्यात आला होता.
Manipur Violence: मणिपूरमध्ये (Manipur) एक महिन्यापेक्षा अधिक काळापासून हिंसाचार सुरु आहे. केंद्र आणि राज्य सरकारने शांतता राखण्याचे आवाहन केल्यानंतरही मणिपूरमध्ये जातीय दंगली सुरुच आहेत. तसेच माजी लष्कर प्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक (Ved Prakash Malik) यांनी मणिपूरच्या स्थितीवर तात्काळा लक्ष देण्याचे आवाहन देखील सरकारला केले आहे.
माजी लष्कर प्रमुख वेद प्रकाश मलिक यांनी मणिपूरमधील एका माजी लष्करी अधिकाऱ्याच्या ट्वीटकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. त्यांनी मणिपूरमधील परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना ताताडीने यासंदर्भात उच्च पातळीवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.
An extraordinary sad call from a retired Lt Gen from Manipur. Law & order situation in Manipur needs urgent attention at highest level. @AmitShah @narendramodi @rajnathsingh https://t.co/VH4EsLkWSU
— Ved Malik (@Vedmalik1) June 16, 2023
मणिपूरची सिरियासोबत तुलना
निवृत्त लेफ्टनंट जनरल निशिकांत सिंह यांनी मणिपूरच्या परिस्थितीबद्दल ट्विट केले. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं की, "मी मणिपूरचा एक सामान्य नागरिक आहे. निवृत्तीनंतर सामान्य आयुष्य जगत आहे. पण सध्या मणिपूर राज्य हिंसक होत आहे. सध्या कोणीही कोणाचेही आयुष्य आणि मालमत्ता कधीही संपवू शकतो. जसे लिबिया, लेबनॉन, नायजेरिया, सीरियामध्ये घडत आहे तसेच. असं वाटतयं मणिपूरला त्याच्या परिस्थितीवर सोडून दिलं आहे. मणिपूरची ही व्यथा कोणी ऐकतयं का?'
निशिकांत सिंह यांच्या ट्वीटला प्रतिसाद देत माजी लष्कर प्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांनी ट्वीट केले आहे. तसेच मणिपूरच्या परिस्थितीवर उच्च पातळीवर तात्काळ लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. मणिपूरच्या हिंसाचारावर तात्काळ मार्ग शोधण्याचे देखील त्यांनी आवाहन केले आहे. सध्या मणिपूरमधील चित्र फार भयानक असून लवकरात लवकर या परिस्थितीवर तोडगा काढणे देखील आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मणिपूरच्या परिस्थितीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून कोणती पावलं उचलण्यात येतील हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.
An extraordinary sad call from a retired Lt Gen from Manipur. Law & order situation in Manipur needs urgent attention at highest level. @AmitShah @narendramodi @rajnathsingh https://t.co/VH4EsLkWSU
— Ved Malik (@Vedmalik1) June 16, 2023
मणिपूरमध्ये हिंसेचं सत्र सुरुच
मणिपूरमध्ये 3 मे पासून कुकी समाजाच्या रॅलीनंतर हिंसेला सुरुवात झाली. या रॅलीचे मैतेई समाजाच्या लोकांच्या विरोधात आयोजन करण्यात आले होते. तसेच या रॅलीमध्ये या समाजाच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली होती. आतापर्यंत मणिपूरच्या हिंसाचारामध्ये जवळपास 100 जणांचा मृत्यू झाला आहे. तर यामुळे 300 पेक्षा अधिक लोकं जखमी झाले आहेत. दहा हजारांपेक्षा जास्त लोकांची घरे जाळण्यात आली आहेत. तसेच या हिंसाचारामुळे अनेक लोकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, तर अनेकांना आर्थिक नुकसानाचा देखील सामना करावा लागत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Jammu Kashmir : पाकचा 'नापाक' इरादा... सुरक्षा दलांनी उधळला पाकिस्तानचा कट, 5 दहशतवाद्यांचा खात्मा