एक्स्प्लोर
16 वर्ष उपोषण केलेल्या इरोम शर्मिलांना जुळ्या कन्या
16 वर्ष अफस्पा कायद्याविरोधात उपोषण करणाऱ्या मानवी अधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांना वयाच्या 48 व्या वर्षी जुळ्या मुली झाल्या
बंगळुरु : मणिपूरमधील मानवी अधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला यांना 'मदर्स डे'लाच जुळी अपत्यं झाली. 'आयर्न लेडी' अशी ओळख असलेल्या इरोम शर्मिला यांनी रविवारी बंगळुरुत जुळ्या मुलींना जन्म दिला. 'अफस्पा' कायद्याविरोधात उपोषणासाठी त्यांनी आयुष्याची 16 वर्ष वेचली होती.
इरोम शर्मिला यांनी मुलींची नावं निक्स शाखी आणि ऑटम तारा अशी ठेवली आहेत. 48 व्या वर्षी इरोम यांना मातृत्वसुख मिळालं. इरोम शर्मिला यांनी ब्रिटिश मित्र डेसमंड काउंटिन्हो यांच्याशी 2017 मध्ये विवाह केला होता.
समाजासाठी 16 वर्षे उपोषण करणाऱ्या इरोम शर्मिलांना अवघी 90 मतं
इरोम शर्मिला यांची प्रकृती आता स्थिर आहे. लवकरच त्यांच्या मुलींचे फोटो शेअर केले जातील. सिझेरियन पद्धतीने त्यांची प्रसुती झाली.
'मदर्स डेला इरोम यांना मातृत्वसुख लाभणं, हा केवळ एक योगायोग आहे, असं इरोम यांच्या डॉक्टरांनी सांगितलं. शनिवारी रात्री इरोम यांच्या पोटात दुखू लागल्याने रविवारी त्यांची प्रसुती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयर्न लेडी इरोम शर्मिला यांचं उपोषण 16 वर्षांनी मागे
मणिपूरमधील 'आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट' (अफ्स्पा) म्हणजेच सशस्त्र दल विशेषाधिकार कायदा रद्द करण्यासाठी इरोम शर्मिलांनी 2000 सालापासून उपोषण सुरु केलं होतं. त्यांना जिवंत ठेवण्यासाठी नलिकेच्या मदतीनं जबरदस्ती लिक्विड डाएट दिलं जात होतं. 16 वर्षांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 2016 रोजी इरोम यांनी उपोषण सोडलं. त्यानंतरही समाजकार्याच्या ध्यासातून त्यांनी 'प्रजा' या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. मणिपूर विधानसभा निवडणुकीत त्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार होत्या. मात्र त्यांच्या पदरात अवघी 90 मतंच पडल्याने त्यांचा दणदणीत पराभव झाला.संबंधित बातम्या
मणिपूरची 'आयर्न लेडी' इरोम शर्मिला यांचा दारुण पराभव
मणिपूरची 'आयर्न लेडी' इरोम शर्मिला विवाहबंधनात अडकणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement