एक्स्प्लोर

PM Modi Vs Kharge: पंतप्रधान मोदींनी 'त्या' वक्तव्यावर बोट ठेवत काँग्रेसवर टीकेची राळ उठवली, मल्लिकार्जुन खरगेंचाही पलटवार

PM Modi Vs Mallikarjun Kharge: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील ट्विटरवरचा वाद सध्या चांगलाच गाजत आहे.

बंगळुरु: राज्यातील मतदारांना आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असलेलीच आश्वासने द्या, असा सल्ला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी अलीकडेच कर्नाटकातील नेत्यांना दिला होता. त्यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी ट्विटरवरुन काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा विरोधकांच्या रेवडी पॉलिटिक्सवर टीका केली आहे. मात्र, आता काँग्रेस पक्षाला कर्नाटकमध्ये सत्तेत आल्यानंतर वास्तवाला धरुन नसलेल्या आश्वासनांची पूर्ती करणे अवघड जात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.  यावरुन मल्लिकार्जुन खरगे यांनीही ट्विट करुन नरेंद्र मोदी यांना प्रत्युत्तर दिले.

खोटेपणा, लबाडी, थापेबाजी, लूट आणि जाहिरातबाजी ही पाच विशेषणे केंद्रातील एनडीए सरकारला लागू पडतात. तुम्ही ढोल बडवत असलेला 100 दिवसांचा प्लॅन हा चीप पब्लिसिटी स्टंट आहे. 16 मे रोजी तुम्ही म्हटले होते की, 2047 मधील भारताचा रोडमॅप तयार करण्यासाठी 20 लाख लोकांशी संवाद साधू, असे तुम्ही म्हटले होते. मात्र, आता सरकारने किती लोकांशी संवाद साधला याचा तपशील माहिती अधिकार कायद्यातंर्गत मागवला असता, संबंधित तपशील पंतप्रधान कार्यालयाने देण्यास नकार दिला. यावरुन तुमचा खोटेपणा उघड होतो. BJP या पक्षाच्या नावातील B हा विश्वासघात (Betrayal) आणि J चा अर्थ जुमला असा होतो. मोदींनी दिलेल्या अच्छे दिन आणि 2 कोटी रोजगाराच्या आश्वासनाचं काय झालं, असा सवालही मल्लिकार्जुन खरगे यांनी उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?

अवास्तव आश्वासनं देणं सोपे असते पण त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करणे अवघड होऊन बसते, याची जाणीव आता काँग्रेस पक्षाला झाली आहे. अवास्तव आश्वासनं प्रत्यक्षात आणणे हे अत्यंत कठीण आणि अशक्य असते. काँग्रेसने अनेक प्रचारसभांमधून लोकांना खोटी आश्वासने दिली. ही आश्वासने पूर्ण करणे शक्य नाही, हे काँग्रेसलाही माहिती होते. आता ते जनतेसमोर वाईट पद्धतीने उघडे पडले आहेत. काँग्रेसची सत्ता असलेले उत्तराखंड, कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा, कोणतेही राज्य बघा, त्याठिकाणी विकासाचा खेळखंडोबा झाला आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती वाईट झाली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते. यावरुन खरगे विरुद्ध मोदी या ट्विटर वॉरला सुरुवात झाली होती.

आणखी वाचा

संभाजी भिडेंकडून PM मोदींवर स्तुतीसुमने; गांधी-नेहरू यांच्या विचारावर टीका करत म्हणाले, 'मोदी हे देव माणूस...'

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
PM Modi Video Row : मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, नरेंद्र मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, संसदीय समितीचे अध्यक्ष निशिकांत दुबे आक्रमक
मार्क झुकरबर्ग यांनी माफी मागावी, मोदींचा व्हिडिओ हटवल्याचं प्रकरण तापलं, निशिकांत दुबे आक्रमक 

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget