एक्स्प्लोर

राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है'ला मोदींचं उत्तर, #MainBhiChowkidar मोहीम सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मै भी चौकीदार हूँ' ही लाईन वापरत आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीयोच्या माध्यामातून देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती यामध्ये देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा स्वत:ला चौकीदार म्हटलं आहे. मात्र यावेळी मोदींनी देशातील प्रत्येक नागरिक चौकीदार असल्याचं स्पष्ट केलं आहे. चौकीदार देशाची सेवा करत आहेत. देशाच्या प्रगतीसाठी जे कुणी मेहनत करतात ते सगळे चौकीदार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मै भी चौकीदार हूँ' ही लाईन वापरत आपल्या ट्विटर हॅन्डलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. भ्रष्टाचार, काळा पैसा, विकास, अस्वच्छता, सामाजिक प्रश्न या विरोधात लढणारा प्रत्येक नागरिक चौकीदार असल्याचं मोदींनी या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटलं आहे. मी एकटा चौकीदार नाही, तर देशाच्या प्रगतीसाठी जे कुणी कठीण परिश्रम करतात ते सगळे चौकीदार आहेत.

नरेंद्र मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, आज देशाचा प्रत्येक नागरिक 'मी पण चौकीदार' असल्याचं बोलत आहे. यासाठी मोदींनी #MainBhiChowkidar या हॅशटॅगचा वापर केला आहे. आपल्या ट्वीटसोबत शेअर केलेल्या व्हिडीओत देशातील विविध राज्यातील लोकांना दाखवण्यात आलं आहे. सरकारच्या विविध योजनांची माहिती या व्हिडीओत देण्यात आली आहे.  भ्रष्टाचार विरोधी लढाई सुरुच राहणार असून यामध्ये देशातील प्रत्येक नागरिक आपल्यासोबत असल्याचं मोदींनी म्हटलं.

राफेल घोटाळ्यावरुन विरोधक आणि खासकरुन राहुल गांधी नरेंद्र मोदींवर सातत्यानं निशाणा साधत आहेत. राहुल गांधी 'चौकीदार ही चोर है' असं म्हणत मोदीविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी भाजपने ही अनोखी शक्कल लढवल्याचं बोललं जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
Sonia Gandhi : 'आणीबाणी ही मोठी चूक होती...', सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, गांधी कुटुंबातील वादाचा पडदा उघडला
'आणीबाणी ही मोठी चूक होती...', सोनिया गांधींचा खळबळजनक खुलासा, गांधी कुटुंबातील वादाचा पडदा उघडला
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
Embed widget