एक्स्प्लोर
बुलंदशहर हिंसाचाराचा सूत्रधार योगेश राजला अटक
बुलंदशहराच्या बीबीनगर पोलिसांनी योगेश राजला रात्री उशिरा अटक केली.
बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर हिंसाचाराचा प्रमुख आरोपी योगेश राजच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळल्या. बरोबर 31 दिवसांनी पोलिसांनी त्याला अटक केली. योगेश राजवर हिंसा भडकवल्याचा आरोप आहे. बजरंग दलचा जिल्हा संयोजक योगेश राज हा हिंसाचाराच्या दिवसापासूनच फरार होता. त्यामुळे त्याला अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं.
बुलंदशहराच्या बीबीनगर पोलिसांनी योगेश राजला रात्री उशिरा अटक केली. खुर्जावरुन बुलंदशहरात येताना ब्रह्मानंद कॉलेजजवळ त्याला बेड्या ठोकल्या. योगेश राजच्या अटकेला उशिर होत असल्याने यूपी पोलिसांवर प्रश्न उपस्थित होत होते.
पोलीस योगेश राजला क्लीन चिट देण्याच्या तयारीत असल्याचंही म्हटलं जात होतं. याआधी पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी प्रशांत नट आणि कलुआ या दोघांना अटक केली होती. पण पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये योगेश राज आरोपी क्रमांक एक होता.
बुलंदशहर हिंसाचार : पोलीस अधिकाऱ्याची हत्या, बजरंग दलाचा सदस्य सूत्रधार
आतापर्यंत 31 आरोपींना अटक
योगेशसह बीजेवायएमचा नेता शिखर अग्रवालही या प्रकरणात आरोपी आहे, ज्याला कोर्टाने 30 दिवसांची सुरक्षा दिली आहे. सुरक्षेची प्रक्रिया पूर्ण होताच त्याला अटक केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं. हिंसाचारानंतर दोघांनी एका व्हिडीओद्वारे स्वत:ला निरपराध असल्याचं सांगितलं. पोलिसांनी आतापर्यंत बुलंदशहर हिंसाचाराच्या 31 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात 3 डिसेंबर रोजी एका शेतात कथित गोहत्या झाली असून एका विशिष्ट समाजातील लोकांनी गोहत्या केली आहे, अशी अफवा पसरली होती. अफवा पसरल्यानंतर लोकांनी गोवंशाचे अवशेष घेऊन रस्ता अडवला. पाहता पाहता गर्दी वाढली. शेकडो लोक विरोध-आंदोलन करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर जमाव आणखीच भडकला. त्यांनी पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली.
जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला आणि अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. यामुळे जमावाचा क्षोभ आणखीच वाढला. थोड्याच वेळात तिथे गोळीबार झाला. यात सुबोध कुमार आणि आणखी एक तरुणी जखमी झाला. सुबोध कुमार यांना रुग्णालयात नेण्यासही जमावाने रोखलं. शिवाय त्यांच्या कारवर तुफान दगडफेकही केली. सुबोध कुमार यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी या प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आला आहे. ज्यात 27 ज्ञात आणि 50-60 अज्ञात लोकांच्या नावाचा समावेश आहे. पोलिसांनी आयपीसीच्या कलम 147, 148, 149, 307, 302, 333, 353, 427, 436, 394 आणि 7 गुन्हेगारी सुधारणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिवाय या प्रकरणाच्या तपासासाठी मेरठ झोच्या अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement