एक्स्प्लोर
Advertisement
सिंधुदुर्ग सर्वात स्वच्छ, तर पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील पाच जिल्हे
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिल्या क्रमांकाचा स्वच्छ जिल्हा ठरला आहे. क्वॉलिटी काऊंन्सिल ऑफ इंडिया या केंद्रीय समितीच्या अहवालात 75 जिल्ह्यांच्या यादीत सिंधुदुर्ग अव्वल स्थानावर आहे.
मैदान आणि डोंगराळ अशा दोन विभागात जिल्ह्यांची निवड करण्यात आली. यामध्ये सिंधुदुर्गने मैदानी विभागात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर डोंगराळ जिल्ह्यांच्या यादीत मंडीने प्रथम स्थान काबिज केलं.
मे, 2016 मध्ये सुरु केलेल्या ग्रामीण स्वच्छ सर्वेक्षणात 22 डोंगराळ आणि 53 मैदानी जिल्ह्याचां समावेश करण्यात आला होता. तब्बल तीन महिने चाललेल्या या सर्व्हेमध्ये सार्वजनिक ठिकाणांवरची स्वच्छता, गावातली स्वच्छतागृहं आणि त्यांचा वापर याचा अभ्यास करण्यात आला.
डोंगराळ विभागात पहिला क्रमांक हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्याचा लागतो. मंडी जिल्ह्याला शंभरपैकी 98.4 गुण मिळाले. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याला 96.8 गुण मिळाले असून तो मैदानी विभागात पहिल्या स्थानावर आहे.
स्वच्छ जिल्ह्यांच्या या यादीत पहिल्या दहामध्ये महाराष्ट्राच्या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये सिंधुदुर्ग दुसऱ्या, सातारा तिसऱ्या, कोल्हापूर पाचव्या, रत्नागिरी आठव्या आणि ठाणे नवव्या क्रमांकावर आहे.
मैदानी विभागातील दहा स्वच्छ जिल्हे
1. सिंधुदुर्ग 96.82 (महाराष्ट्र)
2. नादिया 95.03 (पश्चिम बंगाल)
3. सातारा 92.94 (महाराष्ट्र)
4. मिदनापूर पूर्व 92.65 (पश्चिम बंगाल)
5. कोल्हापूर 91.66 (महाराष्ट्र)
6. हुगळी 91.57 (पश्चिम बंगाल)
7. उडपी 91.08 (कर्नाटक)
8. रत्नागिरी 90.99 (महाराष्ट्र)
9. ठाणे 88.71 (महाराष्ट्र)
10. चारु 88.40 (राजस्थान)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
करमणूक
Advertisement