एक्स्प्लोर

Today's Top News : आज दिवसभरात घडणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या

National News : एबीपी माझाच्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत असतो.

मुंबई : राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

किरीट सोमय्या यांची आज पत्रकार परिषद

भाजपचे नेते किरीट सोमय्या आज दुपारी 1 वाजता प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळी आपण ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचा दावा केला आहे

आज मंत्री धनंजय मुंडेंना डिस्चार्ज मिळणार

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने त्यांना तातडीने मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे.

अॅड गुणरत्न सदावर्ते यांना आज कोर्टात सादर केलं जाणार 

अॅड गुणरत्न सदावर्ते यांना घेऊन गुरुवारी पोलीस साताऱ्यात दाखल झाले. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी गुणरत्न सदावर्तेंना शुक्रवारी 11 वाजता कोर्टात सादर केलं जाणार आहे. दोन वर्षांपूर्वी सदावर्तेंविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदावर्ते गैरहजर राहिल्याने सातारा शहर पोलिसांनी त्यांचा ताबा मिळण्यासाठी गिरगाव न्यायालयात अर्ज केला होता. अखेर पोलिसांची विनंती मान्य करत न्यायालयाने सदावर्ते यांचा ताबा सातारा पोलिसांकडे दिला होता.

आज कोलकाता आणि हैदराबादमध्ये रंगणार सामना 

मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर  कोलकाता आणि हैदराबाद यांच्यामध्ये आयपीएलचा 25 वा सामना होणार आहे. केन विल्यमसन हैदराबाद संघाचं तर श्रेयस अय्यर कोलकाता संघाचं नेतृत्व करत आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामात हे दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येणार आहेत.  संथ सुरुवातीनंतर हैदराबाद संघाने चेन्नई आणि गुजरात संघाविरोधात विजय मिळवला आहे. कोलकाता संघाचा पराभव करत विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने हैदराबादचा संघ मैदानात उतरणार आहे. विजयाच्या पटरीवर परतणाऱ्या हैदराबाद संघाला कोलकाताविरोधात संघात बदल करावा लागणार आहे. हैदराबादच्या वॉशिंगटन सुंदरला दुखापतीमुळे कोलकाताविरोधातील सामन्याला मुकावे लागणार आहे. वॉशिंगटन सुंदरची कमी हैदराबाद संघाला जाणवणार आहे.

श्रीनगर- शोपियानमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार

जम्मू आणि काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचे चार दहशतवादी ठार झाले आहेत. यावेळी चकमक स्थळाकडे जात असताना रस्ते अपघातात भारतीय सैन्याचे दोन जवान शहीद झाले.

श्रीलंकेतील विरोधी पक्ष जेपीव्ही सरकारविरोधात मोर्चा काढणार

श्रीलंकेचा विरोधी पक्ष जनता विमुक्ती पेरामुना (JVP) राजपक्षे सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या विरोधाला पाठिंबा देण्यासाठी पुढील आठवड्यात तीन दिवस भव्य सार्वजनिक मोर्चा काढणार आहे. जनतेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून सरकार ‘हट्टी’ पद्धतीने सत्तेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

आज 'गुड फ्रायडे' आहे 

येशूंनी आपले बलिदान दिले, तो दिवस शुक्रवार होता. त्यामुळे या दिवसाला गुड फ्रायडे म्हटले जाते. हा दिवस जगभरात साजरा केला जातो. या दिवशी ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. जगभरातील चर्चमध्ये या दिवशी विशेष प्रार्थनांचे आयोजन केले जाते.

आज इतिहासात काय घडलं? 

1469: शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची जयंती.

1689: फ्रान्सने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.

1948 : हिमाचल प्रदेश निर्मिती दिवस.

1976: भारताने 15 वर्षांत प्रथमच बीजिंगला आपला दूत पाठवण्याची घोषणा केली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 09 PM 20 January 2025Pankaja Munde on Beed Guardian Minister | बीडचं पालकमंत्रिपद दिलं असतं तर आनंद झाला असता-पंकजा मुंडेZero Hour Jitendra Awhad : धनंजय मुंडेंबाबत जितेंद्र आव्हाडांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 08 PM 20 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Embed widget