एक्स्प्लोर
आठव्या वर्षी मॅट्रिक, पंधराव्या वर्षी एमए, उषा सिन्हांच्या डिग्रीवर शंका
पाटणा : बिहारमधील कथित टॉपर्सचे गुण आणि सामान्यज्ञान यांचा ताळमेळ बसत नसतानाच बिहार राज्य शिक्षण मंडळाच्या माजी प्रमुखांची पत्नीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बोर्डाचे माजी प्रमुख लालकेश्वर सिंह यांची पत्नी उषा सिन्हा वयाच्या आठव्या वर्षी मॅट्रिक आणि वर्षभरातच एमए झाल्याचं डिग्रीवरुन दिसत आहे.
बिहार शिक्षण मंडळातील कथित घोटाळ्यात उषा सिन्हा यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. मात्र लंकेश्वर आणि उषा सिन्हा हे दाम्पत्य पसार झाल्याची माहिती आहे. कथित घोटाळ्यात त्यांचं नाव आलेलं असतानाच आता उषा यांच्या स्वतःच्या डिग्रीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
उषा सिन्हा या जनता दलाच्या माजी आमदार आहेत. प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार 2010 मध्ये बिहार विधानसभेची निवडणूक लढवत असताना त्या 49 वर्षांच्या होत्या. त्यांचा जन्म 1961 मधील आहे, तर उत्तर प्रदेश बोर्डातून 1969 मध्ये (वयाच्या 8 व्या वर्षी) मॅट्रिक झाल्याची नोंद त्यांच्या डिग्रीवर आहे.
1976 मध्ये (वयाच्या 15 व्या वर्षी) अवध युनिव्हर्सिटीतून एमए झाल्याचं त्यांची डिग्री सांगते. विशेष म्हणजे अवध विद्यापीठाची स्थापनाच 1975 मध्ये झाल्याने वर्षभरात त्यांनी मिळवलेल्या पदव्युत्तर पदवीवरही शंका उपस्थित केली जात आहे. 23 व्या वर्षीच त्या मगध विद्यापीठातून पीएचडी झाल्याचं प्रमाणपत्र आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement