एक्स्प्लोर

PM Ujjwala Yojana: 600 रुपयांत LPG सिलेंडर; तुम्हालाही मिळू शकतो 'या' योजनेचा लाभ! सरकार देतंय 75 लाख नवे कनेक्शन

केंद्र सरकारनं 2016 मध्ये ही योजना सुरू केली. तेव्हापासून सुमारे 10 कोटी ग्राहक जोडले गेले आहेत. या योजनेंतर्गत 75 लाख नव्या कनेक्शन्सनाही मान्यता देण्यात आली आहे.

LPG Gas Cylinder Price 600 Rupees: दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईनं (Inflation) सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आणले आहेत. अशातच संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Winter Session of Parliament) महत्त्वाची माहिती देताना केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Union Minister Hardeep Singh Puri) एलपीजीबाबत (LPG Gas Cylinder) सांगितलेल्या आकडेवारीनं नक्कीच अनेकांना दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. संसदेत नेमकं काय म्हणाले केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी जाणून घेऊयात सविस्तर... 

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी (Hardeep Singh Puri) यांनी संसदेत महत्त्वाची माहिती देताना सांगितलं की, गरीब कुटुंबांना स्वस्त दरांत एलपीजी गॅस सिलेंडर (LPG Gas Cylinder) उपलब्ध करून देण्यात सरकार इतर देशांच्या तुलनेत प्रभावी ठरलं आहे. शेजारील देश पाकिस्तान (Pakistan), नेपाळ (Nepal) आणि श्रीलंका (Sri Lanka) येथे एलपीजीच्या किमती (LPG Prices) भारतापेक्षा खूप जास्त आहेत. दरम्यान, केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना एलपीजीच्या वापराबाबतही माहिती दिली.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं की, पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) एलपीजीचा सरासरी दरडोई वापर एप्रिल-ऑक्टोबरमध्ये 3.8 सिलेंडर रिफिल झाला आहे, जो 2019-20 या वर्षात 3.01 सिलेंडर रिफिल होता. आणि या काळात आर्थिक वर्ष 2022-23 ते 3.71 होतं. 

फक्त 600 रुपयांना सिलेंडर, केंद्र सरकारची योजना 

केंद्रीय मंत्री म्हणाले की, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) अंतर्गत केंद्र सरकार गरीब कुटुंबांना 300 रुपये अनुदान देतं. अशा परिस्थितीत, योजनेच्या लाभार्थ्यांना दिल्लीत 603 रुपयांना 14.2 किलोंचा एलपीजी सिलेंडर मिळेल. जर तुम्ही केंद्र सरकारच्या या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला ती नवी दिल्लीत 903 रुपयांना खरेदी करावी लागेल. नंतर, 300 रुपयांची सबसिडी थेट तुमच्या खात्यावर पाठवली जाईल. हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं की, पाकिस्तानमध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत 1059.46 रुपये आहे, श्रीलंकेत 1,032.35 रुपये आणि नेपाळमध्ये 1,198.56 रुपये आहे.

एलपीजीचे ग्राहक वाढले

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी म्हणाले की, 2014 मध्ये 14 कोटी एलपीजी ग्राहक होते, मात्र आता ते 33 कोटी झाले आहे. त्यांनी सांगितलं की, एकट्या पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत सुमारे 10 कोटी ग्राहक आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, 2016 मध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती. गरीब कुटुंबांना परवडणाऱ्या किमतींत एलपीजी गॅसचा लाभ मिळावा, हाच यामागे मूळ हेतू होता. 

PMUY च्या विस्तारास मान्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं आर्थिक वर्ष 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षांत 75 लाख एलपीजी कनेक्शन जारी करण्याच्या योजनेच्या विस्तारास मान्यता दिली आहे. 75 लाख नव्या कनेक्शनसह, पीएम उज्ज्वला योजनेतील एकूण लाभार्थ्यांची संख्या 10.35 कोटी होईल.

PMUY अंतर्गत कसा फायदा मिळतो? 

जर तुम्हाला पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर www.pmuy.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. आता तुम्हाला 'Apply for PMUY कनेक्शन'वर क्लिक करावं लागेल. ज्या कंपनीचा गॅस सिलेंडर तुम्हाला घ्यायचा आहे, ती कंपनी निवडा. यानंतर, कागदपत्रांसह सर्व माहिती भरा आणि अप्लाय बटणावर क्लिक करा. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला काही दिवसांत या योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

BIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Embed widget