एक्स्प्लोर
लैला मजनूपेक्षा नरेंद्र मोदी आणि नितीशकुमार यांचं एकमेकांवर जास्त प्रेम : असदुद्दीन ओवैसी
एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केले आहे.

पाटना : एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य केले आहे. ओवैसी म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. यांचे प्रेम इतिहासातील अजरामर जोडी लैला-मजनू यांच्यापेक्षाही जास्त आहे. ओवैसी यांनी मोदी आणि नितीश कुमार यांच्यात झालेल्या युतीवरुन टीका केली आहे. ओवैसी म्हणाले की, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार या दोघांमध्ये खूप प्रेम आहे. यांचे प्रेम लैला-मजनूहूनही खूप जास्त आहे. नितीश कुमार आणि नरेंद्र मोदी यांची प्रेमकहाणी लिहिली जाईल तेव्हा त्यांच्यातील लैला कोण आणि मजनू कोण? हे मला विचारु नका, ते तुम्हीच ठरवा. ओवैसी एवढ्यावरच थांबले नाहीत, ओवैसी लैला आणि मजनूला उद्देशून म्हणाले की, लैला आणि मजनू ऐका, तुमची प्रेम कहाणी लिहिली जाईल तेव्हा त्यामध्ये प्रेमाऐवजी केवळ द्वेष लिहिला जाईल. जेव्हापासून दोघे एकत्र आले तेव्हापासून भारतात हिंदू आणि मुस्लिमांममध्ये तणाव निर्माण झाला, असे या प्रेम कहाणीत लिहिले जाईल.
Asaduddin Owaisi: Laila aur majnu suno jab tumhari dastaan mohabbat ki likhi jaayegi, to mohabbat ka naam nahi likha jaayega us dastaan mein, nafrat ka naam likha jaayega tumhari dastaan mein, likhega ki jab se ye dono ek saath aaye, Hindustan mein Hindu-Muslim tanav mein hai... https://t.co/VoUHVAbNDh
— ANI (@ANI) April 13, 2019
आणखी वाचा























