2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा मुख्य 'राजकीय दुश्मन' राहुल गांधी नाहीत, मग कोण? सर्वे काय सांगतोय
Lok Sabha Elections : सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
Mood Of The Nation Survey : सत्ताधारी भाजप आणि काँग्रेससह इतर पक्षांनी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीला एक वर्षांपेक्षा कमी कालावधी राहिला आहे. त्याआधी मतदारांचा कौल जाणून घेतला आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दल सर्वे करण्यात येतोय तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोधक कोण असेल, याबाबत लोकांना काय वाटतेय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. 2024 मध्ये पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या विरोधात देशभरातील विरोधक एकवटले आहेत. 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदींचा विरोधक कोण असेल? याबाबत इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी एकत्र सर्वे केला आहे.
विरोधी पक्षांमध्ये एकापेक्षा एक सरस नेते असतानाही नरेंद्र मोदी यांचा राजकीय विरोधक कोण असेल? असा प्रश्न वारंवार उपस्थित होत आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पराभव कोण करेल? 'मूड ऑफ द नेशन' च्या आकडेवारीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणता नेता टक्कर देणार? याचा अंदाज घेतला गेला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोण देणार टक्कर?
इंडिया टुडे आणि सी वोटर यांच्या सर्वेनुसार, आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल 2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींचे सर्वात मोठे विरोधक असल्याचं समोर आलेय. 24 टक्के लोकांनी मोदींचा सक्षम विरोधक म्हणून अरविंद केजरीवाल यांना पसंती दर्शवली आहे. त्यानंतर 20 टक्क्यांसह ममता बॅनर्जी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तर 13 टक्क्यांसह राहुल गांधी तिसऱ्या क्रामांकावर आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना 5 टक्के मतं मिळाली आहेत. सर्वेनुसार, 2024 मध्ये अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीए यांचे सर्वात मोठे विरोधक असतील.
विरोधी पक्षातील सक्षम नेता कोण ? | अरविंद केजरीवाल | राहुल गांधी | ममता बनर्जी | नवीन पटनायक |
सर्वे काय सांगतोय | 24 टक्के | 20 टक्के | 13 टक्के | 5 टक्के |
राहुल गांधी पिछाडीवर -
दरम्यान, विरोधीपक्षातील सर्वात प्रभावी आणि ताकदवार नेता कोण आहे? यामध्ये अरविंद केजरीवाल यांना सर्वाधिक जणांनी पसंती दर्शवली आहे. राहुल गांधी यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहे. भारत जोडो यात्रानंतरही राहुल गांधी शर्यतीत पिछाडीवर राहिले आहेत.
नोट -
या सर्वेशी एबीपी माझा सहमत असेल असं नाही. इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी घेतलेल्या सर्वेबाबतची माहिती फक्त देण्यात आली आहे. या सर्वेमध्ये एक लाख 40 हजार 917 जणांनी सहभाग घेतला आहे.