एक्स्प्लोर

Lockdown Rumours: लॉकडाऊनच्या अफवा पसरवू नका, लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, केंद्रीय मंत्र्याचं स्पष्टीकरण

Lockdown Rumours: केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देखील सोशल मिडीयावरती पोस्ट करत लॉकडाऊनच्या अफवा पसरवू नका, लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

नवी दिल्ली: मध्य-पूर्वेतील (Middle East) युद्धजन्य परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणानंतर, देशात पुन्हा 'लॉकडाऊन' लागणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत आहेत. मात्र, या दाव्यांमध्ये तथ्य नसून पंतप्रधानांच्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचे समोर आले आहे. अशातच केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी देखील सोशल मिडीयावरती पोस्ट करत लॉकडाऊनच्या अफवा पसरवू नका, लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही असं स्पष्टपणे सांगितलं आहे.

लॉकडाउनबाबत पसरत असलेल्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. सरकारच्या पातळीवर असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकार देशात इंधन, ऊर्जा आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहील, यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येक संभाव्य आव्हानाला तोंड देण्यासाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत. भारताने यापूर्वीही जागतिक अनिश्चिततेच्या काळात आपली ताकद सिद्ध केली आहे, आणि यापुढेही आपण योग्यवेळी, सक्रियपणे आणि समन्वयाने पावले उचलत राहू.​​​​​​​​​​​​​​​, अशी पोस्ट केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी शेअर केली आहे.

पोस्टमध्ये नेमकं काय म्हणालेत?

जागतिक परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे आणि आम्ही ऊर्जा, पुरवठा साखळी (सप्लाय चेन) तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आपल्या नागरिकांसाठी इंधन, ऊर्जा आणि इतर महत्त्वाच्या वस्तूंचा पुरवठा विनाअडथळा सुरू राहील याची खात्री करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जात आहेत. उद्भवणाऱ्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत. भारताने जागतिक अनिश्चिततेच्या काळात नेहमीच आपली कणखरता सिद्ध केली आहे आणि आम्ही यापुढेही वेळेवर, सक्रिय आणि समन्वित पद्धतीने पावले उचलत राहू.

भारतात लॉकडाऊन लागणार असल्याच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. मी हे स्पष्ट करू इच्छितो की, भारत सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. अशा काळात आपण सर्वांनी शांत, जबाबदार आणि संघटित राहणे महत्त्वाचे आहे. या परिस्थितीत अफवा पसरवणे आणि भीतीचे वातावरण निर्माण करणे हे बेजबाबदारपणाचे आणि हानिकारक आहे, हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी आज सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

आखाती देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज भारतात महत्त्वाची बैठक होणार आहे. आज नैसर्गिक आणि पेट्रोलियम गॅससंदर्भात महत्त्वाची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहेत. आज सायंकाळी 6.30 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. प्रत्येक राज्यातील सध्याचा इंधन पुरवठा यासंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे. भविष्यातील उपाययोजनांसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget