एक्स्प्लोर
राष्ट्रपतीपदासाठी डाव्यांची प्रकाश आंबेडकरांना पसंती
नवी दिल्ली : राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून डाव्या पक्षांची पहिली पसंती प्रकाश आंबेडकर यांना आहे. उद्या होणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत सीपीएम प्रकाश आंबेडकरांचं नाव मांडणार आहे.
काँग्रेस आणि इतर उरलेलल्या पक्षांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नावावर सहमती दिली, तर तेच विरोधी पक्षांतर्फे राष्ट्रपतीपदासाठी उमेदवार असतील, असे सीपीएमच्या नेत्यांनी सांगितले.
पेशाने वकील असलेले प्रकाश आंबेडकर हे भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष आहेत. राजकारण आणि समाजकारणाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर खासदार म्हणूनही निवडून गेले होते. त्यांची आणखी एक महत्त्वाची ओळख म्हणजे ते घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.
दरम्यान, भाजप प्रणित एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. एनडीएमधील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेनेही रामनाथ कोविंद यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. कोविंद हे बिहारचे विद्यमान राज्यपाल आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
बातम्या
राजकारण
राजकारण
Advertisement