एक्स्प्लोर

स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी बेळगावात लिंगायत समाज एकवटला!

लिंगायत आणि वीरशैव धर्म हे वेगवेगळे आहेत. बाराव्या शतकात बसवेश्वरांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. राज्य सरकारने लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणीही मठाधीशांनी प्रचंड जनसमुदायासमोर केले.

बेळगाव : लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्यावी आणि जैन, शीख समाजाप्रमाणे असणारे अधिकार द्यावेत, या मागणीसाठी बेळगावात अनेक ठिकाणाहून आलेल्या पन्नासहून अधिक मठाधीशांच्या नेतृत्वाखाली महारॅली काढण्यात आली. महारॅलीत राज्यभरातून आलेले हजारो लिंगायत बांधव-भगिनी सहभागी झाले होते. धर्मवीर संभाजी चौकातून निघालेल्या महारॅलीत गांधी टोपी घालून आणि हातात भगवा ध्वज घेऊन सहभागी झाले होते. लिंगराज कॉलेजच्या मैदानावर राज्यातून आलेल्या पन्नासहून अधिक मठाधीशांच्या आणि नेते मंडळींच्या उपस्थितीत महारॅलीत सहभागी झालेल्या लिंगायत समाजाच्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात आले. स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी बेळगावात लिंगायत समाज एकवटला! लिंगायत आणि वीरशैव धर्म हे वेगवेगळे आहेत. बाराव्या शतकात बसवेश्वरांनी स्थापन केलेला लिंगायत धर्म हा पूर्णपणे वेगळा आहे. राज्य सरकारने लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करावी अशी मागणीही मठाधीशानी प्रचंड जनसमुदायासमोर केले. “गेल्या 900 वर्षांपासून आम्ही हिंदू धर्मापासून वेगळे आहोत. आजही आम्ही हिंदू धर्माबाहेर आहोत. आम्ही हिंदुविरोधी नाही. आम्ही लिंगायतच, आम्ही हिंदू नव्हे. संत बसवेश्वरांनी शिकवलेल्या शिकवणुकीमुळे अन्य धर्मियांनी देखील त्याकाळी लिंगायत धर्माचा स्वीकार केला होता. जैन ,शीख धर्मियांप्रमाणे लिंगायतांना देखील घटनात्मक हक्क मिळाले पाहिजेत”, अशी मागणी लिंगायत अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष आणि निवृत्त आयएएस अधिकारी ए. एस. जामदार यांनी केली. स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी बेळगावात लिंगायत समाज एकवटला! नागनूर रुद्राक्ष मठाचे सिद्धराम स्वामीजी यांनी लिंगायत समाजाच्या मागण्यांचे निवेदन वाचून दाखवले. यावेळी उपस्थित मठाधीशांनी जोरदार घोषणाबाजी करून उपस्थितात चैतन्य निर्माण केले. महारॅली शहरातील प्रमुख रस्त्यावरून फिरून राणी कित्तूर चन्नमा चौकात आली. तेथे लिंगायत समाजाच्या मठाधीशांनी लिंगायत समाजाच्या मागणीचे निवेदन प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. महारॅलीच्यावेळी शहरातील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. बाहेरगावाहून आलेल्या वाहनांसाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. अनेक ठिकाणी भोजनाची, पिण्याच्या पाण्याची सोयही करण्यात आली होती. पोलीस उपायुक्त सीमा लाटकर या स्वतः महारॅलीच्यावेळी पोलीस फौजफाट्यासह लक्ष ठेवून होत्या. सरदार हायस्कूलचे मैदान देखील बाहेरून आलेल्या वाहनांनी भरून गेले होते. निपाणी, कोल्हापूर, हुबळी, धारवाड, सांगली, कोल्हापूर, चिकोडी, विजापूर इत्यादी भागातून लिंगायत समाजाच्या व्यक्ती महारॅलीत सहभागी झाल्या होत्या.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
जगात सर्वाधिक इंटरनेचा वापर करणार देश कोणता? भारताचा कितव्या स्थानी? जाणून घ्या सविस्तर माहिती
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
LPG New Rules : गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल, 1 जूनपासून गॅस सिलेंडच्या नियमांमध्ये बदल
LPG New Rules : गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी सरकारनं उचललं मोठं पाऊल, 1 जूनपासून गॅस सिलेंडच्या नियमांमध्ये बदल

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 मे 2026 | रविवार
Satara Sangli Vidhan Parishad : सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
सातारा सांगली विधानपरिषदेसाठी जयंत पाटील यांचा विश्वासू नेता उमेदवारी अर्ज भरणार, महायुतीचा उमेदवार कोण? 
IPL 2026: आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
आयपीएलमध्ये चक्रीवादळ केलेला वैभव ते किंग कोहलीला क्लिन बोल्ड करणारा प्रिन्स; आयपीएल 2026 ने भारताला 10 भावी स्टार दिले
Share Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका, फायद्यात कोण?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 7 कंपन्यांचं बाजारमूल्य घटलं, दीड लाख कोटी बुडाले, रिलायन्सला सर्वाधिक फटका
N S Raja Subramani: देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
देशाचे तिसरे नवे संरक्षण प्रमुख जनरल एन. एस. राजा सुब्रमणींनी पदभार स्वीकारला; दिल्लीतील साऊथ ब्लॉक लॉन्समध्ये गार्ड ऑफ ऑनर
Balen Shah : नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
नेपाळनेही भारतीय जमिनीवर कब्जा केला; संसदेतील पहिल्याच भाषणात बालेंद्र शाह यांचं मोठं वक्तव्य, ब्रिटनच्या मध्यस्थीची मागणी
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
अल्पसंख्याक विकास विभागातील 406 रिक्त पदे भरा; आमदाराचे सुनेत्रा पवारांना पत्र, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
Embed widget