एक्स्प्लोर
'त्या'ने 80 वर्षीय आईचा मृतदेह तीन वर्ष फ्रीजमध्ये ठेवला
आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता 45 वर्षीय मुलाने तेव्हापासून मृतदेह डीप फ्रीजमध्ये जतन करुन ठेवला आहे.
कोलकाता : कोलकात्यात एका व्यक्तीने आपल्या आईचा मृतदेह तीन वर्षांपासून फ्रीजमध्ये ठेवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी 45 वर्षीय आरोपी मुलाला ताब्यात घेतलं आहे.
शुभभ्रता मुझुमदार असं मुलाचं नाव असून कोलकात्यातील जेम्स लाँग सरनी भागात त्याचं घर आहे.
आरोपीच्या आई बिना मुझुमदार यांचा 80 व्या वर्षी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. तीन वर्षांपूर्वी म्हणजे 7 एप्रिल 2015 रोजी आईने अखेरचा श्वास घेतला होता. मात्र आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करता त्याने तेव्हापासून मृतदेह डीप फ्रीजमध्ये जतन करुन ठेवला आहे.
शुभभ्रता लेदर टेक्नॉलॉजीमध्ये पारंगत असून त्याने केमिकल्सच्या मदतीने आईच्या मृतदेहाचं जतन केलं.
इतकंच नाही, तर 90 वर्षीय वडिलांचा मृत्यू झाला तर त्यांच्यासाठीही शुभभ्रताने दुसरा फ्रीज घरात आधीच आणून ठेवला आहे. तब्बल तीन वर्ष याची कुणकुण कोणालाच कशी लागली नाही? याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.
कोलकाता पोलिसांनी शुभभ्रता मजुमदारला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. त्याच्या घरातही अनेक रसायनांच्या बाटल्या सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement