एक्स्प्लोर

VIDEO: भर पत्रकार परिषदेत अचानक स्टेजवरच कोसळला काँग्रेस नेता; हृदयविकाराच्या झटक्यानं जीव गमावला

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये (Bangalore) एका काँग्रेस नेत्याला (Congress Leder) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Congress President Collapses Due To Heart Attack : नवी दिल्ली : पत्रकार परिषद सुरू असतानाच अचानक काँग्रेस नेता स्टेजवरच कोसळले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे नेता मंचावर कोसळल्याची माहिती मिळत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून चटकन अंगावर काटा येतो. 

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये (Bangalore) एका काँग्रेस नेत्याला (Congress Leder) हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बंगळुरू येथील कोलार कुरुबा संघाचे अध्यक्ष रवींद्र यांना प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान अचानक कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, हृदयविकाराचा झटका एवढा तीव्र होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आली. बंगळुरू येथील कोलार कुरुबा संघाचे अध्यक्ष रवींद्र प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. माईकवर बोलत असताना काँग्रेस नेते रवींद्र अचानक खुर्चीवरून खाली पडले. कोणाला काही कळण्यापूर्वीच रवींद्र कोसळले आणि बेशुद्ध झाले. त्यांना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तोपर्यंत फारच उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. तीव्र हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 

बंगळुरुमधील या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ज्यावेळी पत्रकार परिषद सुरू होती, त्यावेळी खुर्चीवर बसून रवींद्र माईकवरुन संबोधित करत होते. त्याचवेळी त्यांना अचनाक झटका लागल्यासारखं झालं. त्यानंतर त्यांचे पाय अचनाक गळून पडले आणि ते थेट खाली कोसळले. नेमकं काय घडलं? कुणाला काहीच कळालं नाही. दरम्यान, अवघे काही सेकंद गेल्यानंतर एकच गोंधळ उडाला. सर्वजण त्यांच्याजवळ पोहोचले आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं. 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर नेमके आरोप काय? 

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MUDA) कडून पर्यायी जागा वाटप करताना अनियमितता केल्याच्या आरोपावरून राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली होती.

आता राज्यपालांच्या या आदेशाला आव्हान देत काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 17A अंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात चौकशीला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. यामुळे तपास यंत्रणेला सिद्धरामय्यांविरुद्ध तपास करण्याचं स्वातंत्र्य मिळतं. आता उच्च न्यायालय याप्रकरणी काय निर्णय देतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray PC : फक्त याद्यांमध्ये गोंधळ नाही तर अनेक ठिकाणी घोळ, आदित्य ठाकरेंचा आरोप
Ashwini Naitam NCP : गडचिरोलीकर मलाच निवडून देतील,अजित पवार गटाच्या अश्विनी नैताम यांचा विश्वास
Aditya Thackeray on Amit Satam : भाजप हे हिंदू-मुस्लीम वाद लावण्याचा प्रयत्न करत आहे, ठाकरेंची टीका
Narendra Maharaj Nanij : तुम्ही दोन आणि तुमचे दोन असले पाहिजेत, तरच हिंदू जगेल आणि टिकेल
Ayodhya Ram Mandir Dhwajarohan : राम मंदिरावर ध्वजारोहण होणार, अयोध्येत जय्यत तयारी, फुलांची सजावट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2025 | सोमवार
Kolhapur TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
टीईटी पेपरफुटी प्रकरणात कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह 18 जणांना बेड्या; राज्यभर व्याप्ती वाढण्याची शक्यता
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
ठाकरे बंधूंचं निवडणूक आयुक्तांना पत्र, वाघमारेंना दाखवल्या 6 ठळक चुका; मुंबई महापालिका निवडणुकांपूर्वी दुरुस्त करा
Dharmendra : धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारावेळी हेमा मालिनी आणि सनी देओल यांच्यासोबत मी आतमध्ये होतो : रामदास आठवले
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
Donald Trump : बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
बिटकॉईन क्रॅश, डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, तब्बल 9800 कोटी रुपये स्वाहा
Ayushman Bharat : आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे  10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
आयुष्मान भारत योजनेतून 5 नव्हे 10 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येणार,जाणून घ्या कोण घेऊ शकतं लाभ?
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
धर्मेंद्र यांना सुपरस्टारचं बिरुद चिकटलं नाही; पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीसांसह राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी
Embed widget