एक्स्प्लोर

1990 साली अडवाणींची रथयात्रा रोखणारा अधिकारी मोदींच्या मंत्रिमंडळात!

मंत्रिमंडळ विस्तारात आर. के. सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. बिहारमधील आरा मतदारसंघातून खासदार असलेल्या आर. के. सिंह यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांचं नाव आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे.

नवी दिल्ली : 2019 साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली नवी टीम तयार केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात 9 नव्या चेहऱ्यांचा समावेश केला असून, त्यात 4 माजी अधिकारीही आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात एका अशा चेहऱ्याला संधी दिली आहे, ज्याने 1990 साली भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवणी यांची रथयात्रा रोखली होती. त्यांचं नाव आहे आर. के. सिंह. मंत्रिमंडळ विस्तारात आर. के. सिंह यांचा समावेश करण्यात आला आहे. बिहारमधील आरा मतदारसंघातून खासदार असलेल्या आर. के. सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांचं नाव आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. 1990 साली अडवाणींची रथयात्रा रोखणारा अधिकारी मोदींच्या मंत्रिमंडळात! आर. के. सिंह यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माजी उप-पंतप्रधान, माजी गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या आयुष्यातील आठवणींना उजाळा मिळाला आहे. तोही एका वेगळ्या अर्थाने. आर. के. सिंह आणि लालकृष्ण अडवाणी ही दोन नावं एकत्र आली की अनेकांना 30 ऑक्टोबर 1990 ही तारीख आठवते. 1990 मध्ये ज्यावेळी अडवाणींनी राम मंदिरासाठी आंदोलन केलं. त्यावेळी अडवाणींनी सोमनाथहून रथ घेऊन अयोध्याला जात होते, त्यावेळी त्यांना बिहारमध्ये अटक करण्यात आली. अडवाणी यांना अटक करुन  तुरुंगाची वाट दाखवणारा दुसरा-तिसरा कुणी नव्हता, तर ते होते आर. के. सिंह. त्यावेळी आर. के. सिंह हे समस्तीपूरचे जिल्हाधिकारी होते. अडवणींना अटक करुन रांचीच्या तुरुंगात पाठवण्यात आले आणि अशाप्रकारे आर. के. सिंह यांनी लालकृष्ण अडवाणी यांची रथयात्रा अयोध्येत पोहोचण्याआधीच रोखली. आर. के. सिंह हे 1975 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत आणि यूपीए सरकारच्या कार्यकाळात त्यांनी केंद्रीय गृहसचिवपदही भूषवलं आहे. याच पदावरुन ते निवृत्त झाले. पी. चिदंबरम यांच्या पसंतीमुळेच त्यांना गृहसचिव बनवलं गेल्याचं म्हटलं जातं. आर. के. सिंह हे सेंट स्टीफन्स कॉलेजचे विद्यार्थी आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
Maharashtra Live News Updates: अतिवृष्टीग्रस्त पालघरसाठी विशेष पॅकेज, कायमस्वरूपी उपाययोजनांना गती
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, अमित शाहनंतर सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट 
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget