Kerala : आरएसएस कार्यकर्त्यांची वैयक्तिक माहिती SDPI ला देणारा पोलीस अधिकारी निलंबित
आरएसएस कार्यकर्त्याची वैयक्तिक माहिती SDPI ला (Social Democratic Party of India) देणाऱ्या केरळमधील पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन कऱण्यात आलं आहे.
आरएसएस कार्यकर्त्याची वैयक्तिक माहिती SDPI ला (Social Democratic Party of India) देणाऱ्या केरळमधील पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. केरळ पोलिसांनी 28 डिसेंबर रोजी करीमन्नूर पोलीस स्टेशनमधील सीपीओ अनस पीके यांना निलंबित करण्यात आलं आहे. मुस्लिम संघटना एसडीपीआय आणि पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना आरएसएस आणि भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांची माहिती दिल्याचा आरोप अनस पीके यांच्यांवर आहे. आरोपी एसडीपीआय कार्यकर्ता आणि सीपीओ अनस मागील 11 वर्षांपासून घनिष्ठ मित्र होते. अनस यांनी पोलीस रेकॉर्डमधून माहिती आपल्या मित्राला दिल्याचं म्हटलं जातेय. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात आला. त्यानंतर अनस यांच्यावर कारवाई करण्यात आली.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, एका अंतर्गत तपासानंतर केरळ पोलिसांनी मंगळवारी करीमन्नूर पोलीस स्टेशनचे सीपीओ अनस पीके यांना निलंबित केलं आहे. अनस यांनी मुस्लिम संघटना एसडीपीआय आणि पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना आरएसएस-भाजपा कार्यकर्त्यांची आणि नेत्याची माहिती दिल्याचं तपासात समोर आलं आहे.
इडुक्की येथील मधुसूदन या बस चालकावरील हल्ल्याच्या आरोपीकडे अनस यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. आपल्या मुलासोबत प्रवास करत असताना मधुसूदन यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. मुस्लिम धर्माच्या कार्टूनला प्रसारित केल्यामुळे मुस्लिम संघटनाच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. मधुसूदन यांच्यावर एसडीपीआय कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी दोन डिसेंबर रोजी जवळपस सहा एसडीपीआय कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलं होतं. दरम्यान, सीपीओ अनस यांना सध्या इडुक्की मुख्यालयामध्ये ठेवण्यात आलं आहे. तपसानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live
संबधित बातम्या :
Sanjay Raut : महाराष्ट्र सरकार कायद्याप्रमाणे वागतंय, त्याला कोणी अतिशहाणपणा शिकऊ नये; संजय राऊतांचा नारायण राणेंना टोला
Narayan Rane : काल नारायण राणे म्हणाले, मी मूर्ख वाटलो का, आज पोलिसांनी नोटीसच धाडली, मात्र नोटीसमध्ये नेमकं काय?