एक्स्प्लोर
Advertisement
आमदार आणि आयएएस अधिकाऱ्याची 'प्रेमाची गोष्ट'
नवी दिल्ली : पुस्तकं आणि चित्रपटांमध्ये अनेक प्रेमकथा आपण वाचतो किंवा पाहतो. दोन वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्तींच्या काल्पनिक कथा पाहायला सर्वांनाच आवडतात. एक राजकीय नेता आणि आयएएस ऑफिसर यांची लव्ह स्टोरी तुम्ही कधी ऐकली आहे का?
केरळमधील तिरुअनंतपुरमचे काँग्रेस आमदार आणि महिला आयएएस अधिकारी यांची प्रेम कहाणी अशीच अलवार फुलत गेली. लवकरच ही परिकथा पूर्णत्वास जाणार आहे. पुढच्या महिन्यात हे जोडपं विवाहबंधनात अडकणार आहे.
काँग्रेस आमदार केएस सबरीनाथन हे उपजिल्हाधिकारी दिव्या एस अय्यरच्या प्रेमात पडले. सबरीनंदन यांनी फेसबुकवर रिलेशनशीप स्टेटस 'कमिटेड' असं ठेवून आपल्या प्रेमाची जाहीर कबुली दिली.
'मला नेहमीच लग्नाबाबत प्रश्न विचारुन भंडावून सोडलं जायचं. मी उपजिल्हाधिकारी दिव्या एस अय्यरला तिरुअनंतपुरममध्ये भेटलो. आम्ही मनाने जवळ आलो आणि एकमेकांना पुरेसं ओळखायला लागलो. दोन्ही कुटुंबीयांचं प्रेम आणि आशीर्वादाने लवकरच दिव्या माझी साथीदार होणार आहे. आम्हाला तुमच्या आशीर्वादांची गरज आहे.' अशी पोस्ट सबरीनाथन यांनी फेसबुकवर लिहिली आहे.
'कधी कुठल्या नेत्याने आयएएस अधिकाऱ्याशी लग्न केल्याचं माझ्या ऐकिवात नाही. आम्हाला तुम्हा सर्वांच्या आशीर्वादांची नितांत आवश्यकता आहे' असं दिव्या यांनी म्हटलं आहे. पुढच्या महिन्यात हा विवाहसोहळा होणार आहे.
इंटरेस्टिंग गोष्टी ही की आमदार सबरीनाथन यांचे पिता, दिवंगत काँग्रेस नेते जी कार्तिकेन यांनीही प्रेमविवाह केला होता. प्राध्यापक एमटी सुलेखा यांच्याशी त्यांनी केलेल्या प्रेमविवाहाला विरोधाचा सामना करावा लागला होता. मात्र प्रत्येक अडचणीवर त्यांनी मात केली. दोघांच्या प्रेमकहाणीवर एक चित्रपटही तयार करण्यात आला होता.
33 वर्षीय सबरीनाथन 2015 मध्ये तिरुअनंतपुरमच्या जागेवर पोटनिवडणुकीत विजयी झाले होते. त्यानंतर 2016 मध्ये केरळ विधानसभा निवडणुकीत त्याच जागेवर त्यांचा पुन्हा विजय झाला. तर दिव्या 2013 च्या बॅचच्या आयएएस आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
जालना
बीड
व्यापार-उद्योग
Advertisement