मुख्यमंत्री विजयन म्हणाले की आता आपण कोरोनाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत आहोत. तिरुवनंतपुरमच्या पूनतुरा आणि पुल्लुविलासह ज्या भागात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत, तिथं कडक नियम लावले जात आहेत. ते म्हणाले की, जिल्ह्यात 246 नवीन कोरोना केसेस समोर आल्यात, त्यातील 237 लोकं कुणाच्या तरी संपर्कात आल्यानं संक्रमित झाले आहेत. सर्वाधिक संक्रमण झालेल्या भागाला तीन झोनमध्ये रुपांतरीत केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
केरळमधील कोरोनाप्रसार रोखणारा मराठमोळा अधिकारी
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी शनिवारी किनारपट्टी भागात ट्रिपल लॉकडाउन लागू करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या पट्ट्यात आजार अतिशय वेगाने पसरत आहे, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक प्रयत्न करत आहोत, असे ते म्हणाले.
कोविड संसर्गाचा कल समजून घेण्यासाठी मुंबईत पालिकेकडून सेरो सर्वेक्षण सुरू
केरळने आता कोरोना व्हायरसच्या चाचणी वाढवल्या आहेत. चाचण्याच्या बाबतीत देशातील सर्वात कमी दरांपैकी हा दर आहे. केरळने आतापर्यंत चार लाखांपेक्षा कमी चाचण्या केल्या आहेत, तर शेजारच्या तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये तिप्पट संख्या नोंदली गेली आहे. केरळमध्ये आतापर्यंत 11066 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 4995 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
#Corona केरळमधील कोरोनावर कसा विजय मिळवला? केरळात कोरोनाचा प्रसार रोखणारा मराठमोळा अधिकारी IPS विजय साखरे!
दरम्यान आज अमेरिकेनंतर सर्वात जास्त कोरोना रुग्ण भारतात आढळून आले आहेत. देशात कोरोनाबाधितांची संख्या 10 लाखांच्या पार गेली आहे. मागील 24 तासात सर्वाधिक 34,884 नवीन केसेस समोर आल्या आहेत. तर 671 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 10,38,716 वर गेली आहे. यातील 358,692 अॅक्टिव केसेस आहेत तर 653,751 लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे. 26,273 लोकांचा आतापर्यंत भारतात मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे.