Heavy Rain Lashes Tamil Nadu : तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये अवकाळी पावसाचा कहर; शाळांना सुट्टी देण्याची वेळ; केरळमध्येही कोसळधारा
पावसामुळे तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यात सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तिरुनेलवेली, कन्याकुमारी, थूथुकुडी, तेनकासी, विरुथुनगर, पुधुकोट्टई, नीलगिरी या जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला.
चेन्नई : तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu Rains) तुफान पावसाने हाहाकार माजवला आहे. अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस बरसत आहेत. या पावसामुळे तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यात सरकारी आणि खासगी शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तिरुनेलवेली, कन्याकुमारी, थूथुकुडी, तेनकासी, विरुथुनगर, पुधुकोट्टई, नीलगिरी या जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला. ऐन हिवाळ्यात तुफान पाऊस बरसत असल्यामुळे तामिळनाडूतील जनजीवन विस्कळीत झालं आहे.
#WATCH | Tamil Nadu: An elephant was rescued safely by forest officials after it was found trapped in an agricultural pond. The officials were patrolling the Madukkarai forest range in Coimbatore when they found the elephant, earlier today. pic.twitter.com/dzGV2wPVom
— ANI (@ANI) November 23, 2023
याआधीच हवामान विभागाने केरळ, तामिळनाडूच्या बहुसंख्य भागात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार कालपासूनच तामिळनाडू, केरळमध्येही पाऊस बरसत आहे.
#WATCH | Tamil Nadu: Heavy rain lashes parts of Tiruchirappalli. pic.twitter.com/0UBFBeUSaV
— ANI (@ANI) November 23, 2023
कुठे विजांचा कडकडाट तर कुठे ढगांचा गडगडाट होत आहे. कालपासून (22 नोव्हेंबर) तुफान पाऊस सुरु असून पावसाचा हा जोर आजही कायम राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळेच तामिळनाडूतील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
🚨 Orange alert issued for Kerala, Tamil Nadu, and Puducherry! 🌧️
— Weather & Radar India (@WeatherRadar_IN) November 22, 2023
Schools in Puducherry and Karaikal closed as heavy rain lash today.
#WeatherAlert #RainyDay #Kerala #TamilNadu #Puducherry #Rain #Rainalert pic.twitter.com/ATkmAjeKIT
कुठे कुठे पाऊस बरसतोय?
दक्षिण भारतात पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. संपूर्ण तामिळनाडूसह खाली केरळ, कन्याकुमारी, तिरुनेलवेल्ली या भागात तुफान पाऊस बरसतोय. या पावसामुळे सखल भागात पाणी तुंबलं आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
आज 23 नोव्हेंबरसाठी हवामान विभागाचा काय अंदाज?
- केरळमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, तमिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारी कर्नाटक आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो.
- किनारी आंध्र प्रदेश, यानम, तेलंगणा आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात गडगडाटासह पावसाची शक्यता
- जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पाऊस किंवा बर्फाचा अंदाज
- अंदमान-निकोबार द्वीपसमूह, अरुणाचल प्रदेश, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये गडगडाटासह पावसाची शक्यता.
- उत्तर भारत, मध्य भारत आणि पूर्व भारतातील धुके पडण्याची शक्यता
इतर महत्वाच्या बातम्या