एक्स्प्लोर

बम बम भोले! 10 मेपासून केदारनाथ धामचे दरवाजे खुले; कपडे, फोटो आणि रिल्स बनवण्यावर निर्बंध, वाचा नियम

Kedarnath Mandir Opens : केदारनाथ धामचे 10 मेपासून खुले होणार आहेत. मंदिरात दर्शनासाठी समितीने काही नियम लागू केले आहेत.

मुंबई : शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. केदारनाथ धामचे  (Kedarnath Dham) दरवाजे 10 मे पासून खुलं होणार आहेत. दर्शनाची आस लावून बसलेल्या लाखो श्रद्धाळूंसाठी आणि पर्यटकांसाठीही हा महत्त्वाचा क्षण असेल. केदारनाथचे कपाट (Kedarnath Temple) खुलण्याची सर्वतोपरी तयारी सुरु आहे. मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

चलो बाबा केदारनाथ...

सोमवारी ओंकारेश्वर मंदिरात केदारपुरीचे रक्षक बाबा भैरवनाथ यांच्या पूजेने केदारनाथचे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया सुरू झाली. बाबा केदार यांची पंचमुखी चाल-विग्रह उत्सव डोली सोमवारी विशेष पूजन करून निज धामकडे प्रस्थान झाली आहे. यासाठी ओंकारेश्वर मंदिराला आठ क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं. श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे.  आता 9 मे रोजी ही डोली केदारनाथ धाममध्ये दाखल होईल. 

केदारनाथ मंदिर या दिवशी सुरु होणार 

बाबा केदारनाथ धामचे दरवाजे 10 मे रोजी सकाळी 7 वाजेपाासून उघडण्यात येतील. देशविदेशातून भाविक यासाठी दाखल होत आहेत. बाबा केदारनाथ मंदिर बद्रीनाथ-केदारनाथ धाम समितीकडून दर्शनासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत. 

10 मे ते 3 नोव्हेंबरपर्यंत केदारनाथ मंदिर खुलं

केदारनाथ धाम मंदिराचे कपाट खुलण्याची प्रक्रिया 10 मे रोजी पहाटे सुरु होईल. 6.20 मिनिटांनी मंत्रोच्चारामध्ये या प्रक्रियेला सुरुवात केली जाईल, त्यानंतर केदारनाथ धाम भाविकांना दर्शनासाठी खुलं केलं जाईल. 10 मे 2024 पासून 3 नोव्हेंबर 2024 पर्यंत केदारनाथ मंदिर दर्शनासाठी खुलं असेल.

कपाट खुलताना हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चार धामचे कपाट खुलण्यासंदर्भात माहिती दिली आहे. पुष्कर सिंह धामी  म्हणाले की, ज्या दिवशी चार धामांचे दरवाजे उघडतील, त्या दिवशी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल. भाविकांची चार धाम यात्रा अधिक चांगली करण्याची सरकारची जबाबदारी आहे.

10 मेपर्यंत सर्व तयारी पूर्ण होईल

चारधाम यात्रा सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी 10 मे पर्यंत सर्व तयारी पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. येथे येणाऱ्या भाविकांची योग्य सोय केली जाईल.

बद्रीनाथ-केदारनाथ धाम समितीकडून लागू करण्यात आलेले नियम

  • मंदिर समितीकडून भाविकांसाठी कडक ड्रेसकोड लागू नाही. मात्र, मर्यादित कपडे घालण्याचं आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आलं आहे.
  • केदारनाथ धाम मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यावर निर्बंध आहेत.
  • मंदिर परिसरात फोटो काढण्यास, रिल बनवण्यास किंवा कोणताही व्हिडीओ शूट करण्यास मनाई आहे. गेल्या वर्षी काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर समितीने हा निर्णय घेतला आहे.

 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Kedarnath Mobile Ban : केदारनाथमध्ये मोबाईल बंदी, फोटो आणि रिल्स बनवणाऱ्यावरही कारवाई होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
Embed widget