Kedarnath Amarnath Yatra : दोन वर्षांनंतर अमरनाथ यात्रा पुन्हा यात्रेकरूंसाठी सज्ज; प्रवासाचा मार्ग ते नोंदणी प्रकिया येथे आहे संपूर्ण माहिती
Kedarnath Amarnath Yatra : दोन वर्षांनंतर केदारनाथ यात्रा येत्या 30 जूनपासून पुन्हा सुरु होणार आहे. येथे आणि संपूर्ण माहिती.
Kedarnath Amarnath Yatra : दोन वर्ष कोरोनाच्या सावटाखाली राहिल्यानंतर येत्या 30 जूनपासून अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु होत आहे. 43 दिवसांची ही यात्रा असणार आहे. या यात्रेसाठी 11 एप्रिलपासून नोंदणी सुरु झाली आहे. तुम्ही देखील बाबा बर्फानीचं दर्शन घेण्याचा विचार करत असाल तर प्रवासाचा मार्ग, नोंदणीची प्रक्रिया आणि प्रत्येक आवश्यक माहिती या माहितीद्वारे जाणून घ्या.
दोन वर्षांनंतर पुन्हा सुरु होणार अमरनाथ यात्रा :
30 जून 2022 ते 11 ऑगस्ट 2022 पर्यंत ही यात्रा असणार आहे. तुम्हालाही या यात्रेत सहभागी व्हायचं असेल तर नोंदणी कशी करायची हे जाणून घ्या.
या यात्रेसाठी कोण अप्लाय करू शकणार नाहीत ?
- 6 महिन्यांच्या पुढील गर्भवती महिला
- गंभीर आजार असलेले व्यक्ती
- 13 वर्षांखालील लहान मुलं
- 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक
तुम्ही यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींनी नोंदणी करू शकता.
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी :
श्री अमरनाथ श्राईन बोर्डाच्या (jksasb.nic.in) या संकेतस्थळावर नोंदणी करू शकता.
अशा पद्धतीने नोंदणी करा.
- वेबसाईट ओपन करा
- नोंदणीवर जा
- अॅप्लिकेशन फॉर्म भरा
- OTP नंबरने Verify करा
- आता तुम्हाला अॅप्लिकेशन प्रक्रिया पूर्ण झाल्याचा मेसेज येईल
- नोंदणीचे पैसे भरा
- तुमची नोंदणी डाऊनलोड करा
- नोंदणी शुल्क प्रत्येकी 100 रूपये
ऑफलाईन नोंदणी या बॅंकांतून करू शकता.
- पंजाब नॅशनल बॅंक (Punjab National Bank)
- जम्मू एन्ड काश्मीर बॅंक (Jammu and kashmir Bank)
- येस बॅंक (Yes Bank)
कोणते कागदपत्रं लागतील ?
- आधार कार्ड
- 4 पासपोर्ट साईझ फोटो
- सरकारी हॉस्पिटलचे आरोग्य प्रमाणपत्र (Health Certificate)
- आरोग्य प्रमाणपत्र अधिकृत डॉक्टरांचे असावे.
अमरनाथला पोहोचण्याचे दोन मार्ग कोणते ?
1. बालटाल मार्ग
बालटालहून अमरनाथ गुहा जवळपास 14 किलोमीटर अंतरावर आहे. येथून एक दिवसांची ट्रेकिंग करून दर्शन करण्यासाठी जाता येते. हा रस्ता कठीण आणि उंच खडकांचा आहे. जलद दर्शन घेणाऱ्यांसाठी हा मार्ग उत्तम आहे
2. पेहेलगाम मार्ग
पेहेलगाम पासून अमरनाथ गुहा जवळपास 36 किलोमीटर अंतरावर आहे. अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 2-3 दिवसांचा प्रवास आहे. अधिकतर ज्येष्ठ नागरिक हा मार्ग निवडतात.
अमरनाथ यात्रेसाठी कोणत्या वस्तू नेणे गरजेचे आहे ?
- आरामदायी कपडे
- आरामदायी बूट
- रेनकोट
- वॉटरप्रूफ बॅग
- अधिकचे कपडे
- पाण्याची बॉटल
- मॉईश्चरायझर क्रिम किंवा वॅसलीन
- ड्रायफ्रूट्स
- चॉकलेट्स
- सुका खाऊ
या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.
- यात्रेच्या दरम्यान अनेक ठिकाणी पोलीस आणि सेनाचे हेल्थ कॅम्प असतील.
- रस्त्यात खाण्या-पिण्याची सोय आणि विश्रांतीची ठिकाणं असतील.
- शॉर्टकट रस्त्याने यात्रा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका.
- तुमचा जर सहप्रवासी हरवला असेल तर याची सूचना लवकरात लवकर पोलिसांना द्या.
- कोणी हरवणार नाही याची दक्षता घेऊन आपापल्या सहप्रवाशांबरोबर एकत्र प्रवास करा.
- सकाळ आणि संध्याकाळच्या आरतीचा लाईव्ह टेलिकास्ट होईल.
- जे यात्रेत सहभागी होऊ शकत नाही ते हेलिकॉप्टरमधून अमरनाथ गुफेत जाऊ शकतात.
- अमरनाथ यात्रेत थांबण्यासाठी स्वस्त दरातील धर्मशाळा आणि मोफत जेवणाची सोय असेल.
- कोणत्याही सुख-सुविधांचा लाभ न घेता अमरनाथ याात्रा जवळपास 5000 रूपयांत केली जाऊ शकते.