एक्स्प्लोर

कठुआतील मुलीवर बलात्कार नाही, केवळ हत्या : साध्वी प्रज्ञा

गुजरातच्या नवसारीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हजेरी लावलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूरने वादग्रस्त विधान केलं आहे.

गांधीनगर : काश्मीरमधील कठुआ सामूहिक प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट असताना, काही राजकीय नेते ह्या मुद्द्यावर राजकारण करण्यात मागे नाहीत. कठुआ प्रकरणात माणुसकीला पायदळी तुडवत, राजकारण सुरु असलेल्यांमध्ये आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. हे नाव म्हणजे साध्वी प्रज्ञा ठाकूर. गुजरातच्या नवसारीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात हजेरी लावलेल्या साध्वी प्रज्ञा ठाकूरने वादग्रस्त विधान केलं आहे. ती म्हणाली की, "कठुआ प्रकरण एक असं षडयंत्र आहे, जे ऐकून मनात एका विशेष जातीवर्गासाठी घृणा निर्माण होते, जे मुस्लीम, काँग्रेस आणि डावे आहेत." "एवढं घृणास्पद कृत्य ज्याला बलात्कार म्हटलं जातं, तो झालाच नाही. तिची केवळ हत्या झाली, हे वैद्यकीय अहवाल सांगतो. हत्या कोणी केली याची माहिती नाही. एका मुस्लीमाने आपल्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप करत त्यात एका हिंदूला अडकवलं. यापेक्षा बीभत्स राजकीय षडयंत्र असूच शकत नाही," असं साध्वी प्रज्ञा म्हणाली. "मुलीची केवळ हत्या झाली, बलात्कार नाही, हत्या कोणी केली माहित नाही. तिच्या हत्येकडे कोणाचं लक्ष गेलं नाही. पण काँग्रेसने, डाव्यांनी, मुस्लीमांनी मृत्यूनंतर तिचा बलात्कार केला. जिचा बलात्कार झाला नाही, तिच्यावर बलात्कार झाल्याचं सांगून घृणास्पद काम केलं. मृत्यूनंतरही तिच्या आत्म्याला शांतता मिळाली नाही," असंही तिने सांगितलं. दरम्यान, कठुआ प्रकरणात पुराव्यांसोबत छेडछाडीची शक्यता लक्षात घेता, राज्य फॉरेन्सिक लॅबऐवजी पुरावे तपासणीसाठी दिल्लीच्या (FSL)लॅबमध्ये पाठवले. यात मुलीसोबत बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. घटनास्थळावरुन मिळालेल्या आरोपींच्या डीएनए नमुन्यांवरुन सिद्ध होतं की, मंदिरातच मुलीसोबत क्रूरकृत्य झालं. कठुआ बलात्कार, हत्या प्रकरण जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये 8 वर्षीय मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आठव्या आरोपीविरोधात सोमवारी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. दरम्यान, या घटनेनंतर आता सर्व स्तरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 10 जानेवारीला मुलगी खेचर चारण्यासाठी कठुआजवळच्या जंगलात गेली होती. तिथून तिचं एका अल्पवयीन आरोपीने अपहरण केलं आणि जवळच्या मंदिराच्या तळघरात लपवलं. सात ते आठ दिवस नराधमांनी तिच्यावर आळीपाळीने अमानुष अत्याचार केले. या नराधमांनी अनन्वित अत्याचारानंतर तिची हत्या केली. शोधाशोध करुन थकल्यावर 12 जानेवारीला तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केली. 17 जानेवारीला जंगलात तिचा मृतदेह अतिशय भीषण अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून एसआयटीकडे सोपवण्यात आला. मुख्य आरोपी आणि माजी सरकारी अधिकारी संजी राम हा दोन महिने फरार होता. मार्चमध्ये संजी राम स्वत: पोलिसांसमोर हजर झाला. मेरठमधून त्याचा मुलगा विशालला अटक करण्यात आली. संजी रामला मदत करणं आणि चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. दोन महिन्यांनी आरोपपत्र दाखल करण्यास वकिलांनी विरोध केल्याने देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. पाहा व्हिडीओ संबंधित बातम्या कठुआ बलात्कार : जितेंद्र आव्हाडांचा देवाला प्रश्न विचारणारा व्हिडीओ ‘बलात्कार ही विकृतीच’, पंतप्रधान मोदींचं कठुआप्रकरणी वक्तव्य मोदींनी मला दिलेला सल्ला स्वत: अंमलात आणावा : मनमोहन सिंह देशाच्या मुलींना न्याय मिळेल, आरोपींना सोडणार नाही : मोदी काश्मिरात चिमुकलीची बलात्कार करुन हत्या

कठुआ बलात्कार : फाशीसाठी पॉक्सोमध्ये बदल करणार : मेनका गांधी 

भाजप प्रदेशाध्यक्ष म्हणतात, असिफाच्या बलात्कारामागे पाकचा हात

देशाच्या मुलींना न्याय मिळेल, आरोपींना सोडणार नाही : मोदी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
Cold Water : बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक, हे 5 दुष्परिणाम माहितीयत?
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Embed widget