(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Karnataka Elections: "जगात कुठेही भारतीय अडकला तर झोप येत नाही", पंतप्रधान मोदींचा सुदानमधून कर्नाटकमध्ये परतलेल्या नागरिकांशी संवाद
PM Modi Meets Hakki Pikki Tribe: सुदानमधून परतेल्या नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त केले आहे.
PM Modi Meets Hakki Pikki Tribe: पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी सुदानमधून कर्नाटकमध्ये परतलेल्या नाागरिकांशी संवाद साधला. ऑपरेशन कावेरीच्या (Opration Kaveri) माध्यमातून हक्की पिक्की जमातीच्या 210 जणांना सुदानमधून कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये आणण्यात आलं. जगात कुठेही भारतीय अडकला तर झोप येत नसल्याचं मोदी या वेळी म्हणाले.
सुदानमधून परतलेल्य नागरिकांनी पंतप्रधान मोदींना सुदानमधील कठीण परिस्थितीचा सामना त्यांनी कसा केला आणि सरकार आणि भारतीय दूतावासाने त्यांची कशी मदत केली याविषयी सांगितले. सरकराने आपली हाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेतली हे सर्व पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाल्याची भावना या वेळी नागरिकांनी व्यक्त केली. परतेल्या नागरिकांनी पंतप्रधान मोदींचे आभार व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील परतलेल्या नागरिकांशी संवाद साधला. संकटात सापडलेल्या प्रत्येक भारतीयाच्या मदतीसाठी सरकार सदैव तत्त्पर आहे. जगात कुठेही भारतीय अडकला तर झोप येत नसल्याचं देखील मोदी या वेळी म्हणाले.
PM Shri @narendramodi interacts with Hakki Pikki tribe members evacuated under #OperationKaveri, in Shivamogga, Karnataka. pic.twitter.com/5v13fOb0UL
— BJP (@BJP4India) May 7, 2023
सुदानमध्ये (Sudan) सुरु असलेल्या हिंसाचारात अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरुप परत आणण्यासाठी 'ऑपरेशन कावेरी' (Operation Kaveri) सुरु केले होते. हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण करुन भारतीय वायुसेनेचे शेवटचे विमान 47 प्रवशांना शुक्रवारी 5 मे रोजी मायभूमीत परतले आहे. भारताच्या 'ऑपरेशन कावेरी' अंतर्गत सुदानमधून 3,862 नागरिकांना सुखरुप मायदेशात आणले असल्याची माहिती परराष्ट्र मंत्री डॉ. एस.जयशंकर यांना दिली आहे.
लष्करी संघर्षाचा आरोग्यव्यवस्थेवर परिणाम
सुदानमधील लष्करी संघर्षाचा आरोग्यव्यवस्थेवर परिणाम, औषधांची आणि आधुनिक यंत्रणांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. आरोग्य यंत्रणांवर ताण आला आहे. कतारने विशेष विमानातून सुदानला पाठवली अन्नधान्याची मदत केली. तर 150 पेक्षा जास्त कतारच्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेच्या 17 विमानांनी सूदान मधून उड्डाण करत सौदी अरेबियाच्या जेद्दा विमानतळापर्यंत भारतीयांना सुखरुप पोहचवण्यासाठी जवळपास पाच फेऱ्या मारल्या आहेत. सुदानच्या सीमेवर असणाऱ्या देशातून जवळपास 86 भारतीयांना परत आणण्यत आले आहे. तसेच जे भारतीय नागरिक सुखरुप सौदी अरेबियामध्ये पोहचले त्यांना आवश्यक ती मदत केल्यामुळे भारताने सौदी अरेबियाचे देखील आभार मानले आहेत. तसेच भारताने फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका, संयुक्त अरब या देशांचे देखील आभार मानले आहेत.
हे ही वाचा :