कर्नाटक विधानपरिषद उपसभापतींचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडला, सुसाईड नोटमध्ये 15 डिसेंबरच्या घटनेचा उल्लेख
कर्नाटक विधानपरिषदचे उपसभापती एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडला आहे. त्यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोट सापडली असून त्यात 15 डिसेंबर रोजी सभागृहात काँग्रेस सदस्यांनी केलेल्या धक्काबुक्कीमुळे दु:खी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
बंगळुरु : कर्नाटक विधानपरिषदचे उपसभापती आणि जेडीएसचे नेते एस एल धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये चिकमंगळुरुमधील कादूरजवळच्या रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. कदूर पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मेगौडा यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये 15 डिसेंबर रोजी सभागृहात काँग्रेस सदस्यांनी केलेल्या मारहाणीमुळे दु:खी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
विधानपरिषदेत 15 डिसेंबर रोजी काँग्रेस सदस्यांनी एस एल धर्मेगौडा यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. तसंच त्यांना खुर्चीवरुन ढकललं होतं. धर्मेगौडा या घटनेने अतिशय दु:खी होते.
सभापती नियुक्तीला विरोध आणि सभागृहात गोंधळ दरम्यान काँग्रेसचे सदस्य सभापतींच्या नियुक्तीचा विरोध करत होते. उपसभापती एस एल धर्मगौडा खुर्चीवर बसताच गोंधळ एवढा वाढला की काँग्रेस सदस्यांनी त्यांना खुर्चीवरुन ढकललं. यावेळी काँग्रेस आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली.
ट्रेनसमोर उडी मारुन जीव दिल्याची सूत्रांची माहिती चिकमंगळुरु जिल्ह्यातील गुनसागरच्या कडूर तालुक्यात त्यांनी रेल्वेसमोर उडी मारुन जीव दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. धर्मेगौडा सोमवारी (28 डिसेंबर) रात्री उशिरा आपल्या घरातून कारमधून निघाले होते. बराच वेळ होऊनही ते घर न परतल्याने पोलीस आणि त्यांचे कर्मचारी त्यांना शोधण्यास बाहेर पडले. त्यानंतर आज आज पहाटे रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला.
मूळगावी अंत्यसंस्कार धर्मेगौडा यांच्यावर चिकमंगळुरुमधील सरपनहल्ली या मूळगावी अंत्यसंस्कार होणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी धर्मेगौडा यांनी या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "मला विश्वास बसत नाही. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ओम शांती"
Karnataka Legislative Council उपसभापती एस. एस धर्मगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला