एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कर्नाटक LIVE : येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान
कर्नाटक सीएम रेस: येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
कर्नाटक सीएम रेस नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टात मध्यरात्री 2 ते पहाटे पाचर्यंत रंगलेल्या युक्तीवादानंतर, अखेर आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.
येडियुरप्पा तिसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले.
आज येडियुरप्पा यांनी एकट्यांनीच शपथ घेतली. त्यांना आता येत्या 10 दिवसात बहुमत सिद्ध करायचं आहे.
कोर्टाचा हिरवा कंदील
सुप्रीम कोर्टाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे 5 पर्यंत ऐतिहासिक सुनावणी घेत, येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला. कर्नाटकच्या राज्यपालांनी येडीयुरप्पांना सत्ता स्थापनेचं निमंत्रण देताच काँग्रेसनं रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
मात्र सुप्रीम कोर्टात पहाटेपर्यंत युक्तीवाद झाल्यानंतर, कोर्टाने काँग्रेसची मागणी अमान्य केली. तसंच येडियुरप्पांच्या शपथविधीला हिरवा कंदील दाखवला.
त्यामुळे बी एस येडियुरप्पा यांनी ठरवल्याप्रमाणे 17 मे रोजी 9 वा. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून आज शपथ घेतली.
मात्र मध्यरात्रीच्या या ऐतिहासिक घटनानंतरही भाजपचा अडथळा अजून कमी झालेला नाही. कारण कोर्टाने येडियुरप्पांना शपथविधीसाठी हिरवा कंदील दाखवला असला, तरी समर्थक आमदारांची यादीही मागवली आहे.
याप्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी 10.30 वा. होणार आहे.
LIVE UPDATE
- येडीयुरप्पा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत विराजमान
- माजी पंतप्रधान देवेगौडाही काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचले
- येडियुरप्पा सरकारविरोधात कर्नाटक विधानभवन परिसरात काँग्रेसचं आंदोलन, दोन पक्षांचीही आंदोलनाला साथ
- नवे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा विधानभवनात दाखल
- काँग्रेस आमदारांचं कर्नाटक विधानभवनाबाहेर आंदोलन
- काँग्रेस आमदार कर्नाटक विधानभवनाबाहेर आंदोलन करणार
- आज सकाळी 9 वा येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- कर्नाटकात कडेकोट बंदोबस्त
- येडियुरप्पा निवासस्थानाकडून राजभवनकडे रवाना
- येडियुरप्पा यांचा आज शपथविधी, सकाळी 9 वा. शपथविधी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
Advertisement