एक्स्प्लोर

शपथविधी ते येडियुरप्पांचा राजीनामा, 55 तासात नेमकं काय घडलं?

येडियुरप्पा यांचा राजीनामा: येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं.

येडियुरप्पा यांचा राजीनामा: बंगळुरु: मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती. त्यानंतर अवघ्या 55 तासात त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं. सुप्रीम कोर्टाने कालच भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आज दुपारची मुदत दिली होती. भाजपला बहुमताचा 112 हा आकडा गाठणं अशक्य होतं. पण तरीही आम्ही बहुमत सिद्ध करु, असा दावा भाजप आणि येडियुरप्पांकडून करण्यात येत होता. दुसरीकडे काँग्रेस 78 आणि जेडीएसने 38 = 116 जागांच्या जोरावर सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यामुळे  भाजप सरकार कोसळल्यामुळे, कर्नाटकात आता काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सत्तेवर येणार आहे. जनता दल सेक्युलरचे नेते कुमारस्वामी हे नवे मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. येडियुरप्पा यांचं भावूक भाषण आज दिवसभर कर्नाटक विधानसभेत मोठ्या घडामोडी घडल्या. आज आमदारांचा शपथविधी होता. मात्र अनेक आमदार उशिरा पोहोचल्याने आमदारांच्या पळवापळवीची चर्चा होती.  त्यानंतर दुपारी साडेतीनपर्यंत सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात आलं होतं. आज दुपारी साडेतीन वाजता कर्नाटक विधानसभेच कामगाज पुन्हा सुरु झालं. यावेळी येडियुरप्पा यांनी अत्यंत भावूक भाषण केलं. कन्नडमध्ये केलेल्या भाषण त्यांनी कर्नाटकातील काँग्रेसवर टीका केली. “काँग्रेसप्रणित सिद्धरामय्या सरकारने कर्नाटकात विकासकामं केली नाहीत. केंद्राच्या निधीचा वापर केला नाही. मी आतापर्यंत जनतेसाठी काम करत आलो आहे आणि शेवटच्या श्वासपर्यंत जनतेसाठीच काम करत राहीन” असं येडियुरप्पा म्हणाले. येडियुरप्पांच्या भाषणातून ते समारोप किंवा निरोपाचं भाषण करत आहेत, हे दिसून येत होतं. अखेर त्यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आणि सर्वावर पडदा पडला. येडियुरप्पांचा शपथविधी ते राजीनामा काय घडलं? कर्नाटक विधानसभेसाठी 224 पैकी 222 जागांसाठी निवडणूक झाली. त्या निवडणुकीचा निकाल 15 मे रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजप 104, काँग्रेस 78, जनता दल (सेक्युलर) 37, बहुजन समाज पार्टी 1, कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1 आणि अपक्ष 1 अशा जागा निवडून आल्या. मात्र निवडणुकीनंतर लगेचच काँग्रेस आणि जनता दलाने एकत्र येत सत्तास्थापनेचा दावा केला. पण भाजपने सर्वात मोठा पक्ष असल्याने आपणच सत्ता स्थापन करणार असा दावा राज्यपालांकडे केला. 16 मे रोजी राज्यपालांचं भाजपला आमंत्रण भाजपने निकालाच्या दुसऱ्याच दिवशी बी एस येडियुरप्पा यांना विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड केली. त्यानंतर येडियुरप्पा यांनी सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला. काँग्रेस आणि जेडीएस यांच्या 116 जागा म्हणजेच बहुमताचा 112 हा आकडा पार करत असूनही, राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी पाचारण केलं. 16 मे रोजी रात्री राज्यपालांनी तसं पत्र येडियुरप्पा यांना दिलं. वाद मध्यरात्री सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री सव्वा दोन ते पहाटे पाचपर्यंत दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, काँग्रेसची मागणी अमान्य केली. तसंच भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार यांच्या शपथविधीला हिरवा कंदिल दाखवला. मात्र त्याचवेळी भाजपला समर्थक आमदारांची यादी सादर करा, असे आदेश देत पुढील सुनावणी दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी 18 मे रोजी ठेवली. 17 मे रोजी शपथ सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी 9 वा. पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यांना शपथ दिली. त्यावेळी येडियुरप्पांनी एकट्यानेच शपथ घेतली होती. उर्वरित मंत्र्यांची शपथ ही बहुमत सिद्ध झाल्यानंतर होणार होती. 18 मे रोजी सुप्रीम कोर्टाचा झटका सुप्रीम कोर्टात शुक्रवारी काँग्रेस आणि भाजपने आपआपली बाजू मांडली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने भाजपला राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी दिलेली 15 दिवसांची मुदत रद्द करत, उद्याच म्हणजे शनिवारी दुपारी 4 वा बहुमत सिद्ध करा, असा थेट आदेश दिला. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय म्हणजे भाजपला मोठा धक्का होता. 19 मे - भाजप सरकार पडलं मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांची आज कर्नाटक विधानसभेत अग्निपरीक्षा होती. भाजपने बहुमत सिद्ध कऱण्यासाठी काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना फोडण्याचा पूर्णत: प्रयत्न केला. मात्र भाजपची डाळ शिजली नाही. आज दुपारी कर्नाटक विधानसभेचं कामकाज दुपारी 3.30 नंतर सुरु झालं. यावेळी येडियुरप्पा यांनी अत्यंत भावूक भाषण केलं. कन्नड भाषेतून केलेल्या भाषणात त्यांनी कर्नाटकातील काँग्रेसवर टीका केली. तसंच मी आतापर्यंत जनतेसाठी काम करत आलो आहे आणि शेवटच्या श्वासपर्यंत जनतेसाठीच काम करत राहीन असं ते म्हणाले. येडियुरप्पांच्या भाषणातून ते समारोप किंवा निरोपाचं भाषण करत आहेत, हे दिसून येत होतं. अखेर त्यांनी राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं. संबंधित बातम्या  येडियुरप्पांचा राजीनामा, कर्नाटकात भाजपचं सरकार कोसळलं   येडियुरप्पा देशातील सर्वात कमी कालावधीचे मुख्यमंत्री   फडणवीसांनाही सिद्ध करावं लागलं होतं बहुमत, राष्ट्रवादी मदतीला धावली होती!  
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 30 सप्टेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  7 AM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 6 AM : 30  सप्टेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local :मुंबईकरांसाठी मोठी बातमी, सलग पाच दिवस पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल रद्द होणार, जाणून घ्या नेमकं कारण...
मोठी बातमी, पश्चिम रेल्वेवरील 150 लोकल 4 ऑक्टोबरपर्यंत रद्द, जाणून घ्या कारण...
CM Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
एकनाथ शिंदे यांचाही आनंद दिघेंप्रमाणे घात करण्याचा डाव होता, शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Khatron Ke Khiladi 14: करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
करण वीर मेहरा ठरला खतरों के खिलाडी 14 चा विजेता; नव्याकोऱ्या कारसह, लाखोंच्या प्राईज मनीचा ठरला मानकरी
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Embed widget