एक्स्प्लोर
हा मूर्ख माणूस दुसऱ्यांनी लिहिलेली स्क्रीप्ट वाचतोय: सुनिता केजरीवाल
नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावणारे माजी मंत्री कपिल मिश्रांवर अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनिता केजरीवाल यांनी हल्लाबोल केला आहे. 'माझ्या मेव्हणांचं निधन झालं आहे. हा मूर्ख माणूस दुसऱ्यांनी लिहिलेली स्क्रीप्ट वाचत आहे.' अशा शब्दात सुनिता केजरीवाल यांनी कपिल मिश्रांवर टीका केली.
ट्विटरच्या माध्यमातून सुनिता केजरीवाल यांनी कपिल मिश्रांवर टीका केली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जमिनीच्या व्यवहारासाठी दोन कोटी घेतल्याचा आरोप कपिल मिश्रांनी केला होता.
दुसरीकडे 'आप'चे संजय सिंह यांनी मीडियासमोर येऊन कपिल मिश्रांनी केलेल्या आरोपासंबंधी काही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या आरोपांबाबत बोलताना कपिल मिश्रा म्हणाले की, 'आपण लवकरच सीबीआयला सीलबंद पाकिटात या संपूर्ण प्रकरणाची माहिती देणार आहोत.' दरम्यान, कपिल मिश्रा यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. काल (सोमवार) अरविंद केजरीवाल यांच्या घरी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत कपिल मिश्रांना पक्षातून निलंबीत करण्याचा निर्णय घेण्यात आला. अरविंद केजरीवाल यांनी आपचे नेते सत्येंद्र जैन यांच्याकडून साडूंच्या जमिनीच्या व्यवहारासाठी 2 कोटींची रोकड स्वीकारल्याचा आरोप कपिल मिश्रा यांनी केला होता. या आरोपावर अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता यांनी प्रत्युत्तर दिलं. मिश्रा यांचं डोकं फिरलं असून ते दुसऱ्यांनी लिहिलेली स्क्रीप्ट वाचत आहेत. अशा शब्दात सुनीता केजरीवालांनी पलटवार केला आहे. संबंधित बातम्या: केजरीवालांनी सत्येंद्र जैनांकडून दोन कोटी घेतले : कपिल मिश्रा कपिल मिश्रांच्या आरोपानंतर अण्णा हजारेंचं केजरीवालांवर टीकास्त्र 'करावे तसे भरावे', रॉबर्ट वढेरांचा केजरीवालांवर निशाणाMy brother in law is no more n this stupid man is speaking all written script without any mind.
— Sunita Kejriwal (@KejriwalSunita) May 8, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement