कानपूर : कानपूरमध्ये पियूष जैन नावाच्या अत्तर व्यापाऱ्यावर आयकर विभागानं छापा टाकलाय. या छापेमारीत 150 कोटी रुपायांची बेनामी मालमत्ता सापडलेय. व्यापारी पियुष जैन यांचा कन्नौजमध्ये अत्तरांचा व्यापार आहे. आयकर विभागानं छापा टाकल्यानंतर काल रात्रभर नोटांची मोजणी सुरू होती. या नोटा गेऊन जाण्यासाठी आयकर विभागानं 50 मोठे खोके आणि कंटेनर मागवण्यात आला. अनेक मशीनच्या मदतीनं रात्रभर नोटांची मोजणी सुरू होती. आणि आज दुपारपर्यंत डोळे विस्फारणारं घबाड आयकर अधिकाऱ्यांच्या हाती लागलंय.


आयकर विभागाने आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. आतापर्यंत 150 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. जैन यांच्या घरात सापडलेल्या नोटांची मोजणी सुरू असून नोटा मोजण्यासाठी अधिकाऱ्यांनी नोटा मोजण्याची मशीन मागवली आहे. कानपूरमध्ये पियूष जैन यांच्या नोटा मोजण्याचे व्हिडीओ समोर आले आहे. जैन यांच्या घरातील कपाटात नोटांचे बंडल मिळाले आहे.






 


CBIC  चे अध्यक्ष विवेक जौहरी यांनी कानपूर येथे केलेल्या छापेमारीनंतर म्हणाले, त्रिमूर्ती फ्रेगन्सेसच्या तीन संस्थांची केलेल्या छाप्यात जवळपास 150 कोटींची रोख मिळाली आहे. CBIC च्या इतिहासातील ही सर्वात मोठी वसूली आहे. आतापर्यंत कोणालाही ताब्यात घेतलेले नाही. 






गुरूवारी सकाळी पीयूष जैन यांच्या घरी,  कारखाना, ऑफिस, कोल्ड स्टोरेज आणि पेट्रोल पंपावर एकाच वेळी छापा टाकला. ही कारवाई कानपूर, कन्नौज, गुजरात, मुंबई येथे एकाचवेळी छापे टाकले.  दरम्यान पीयूष जैन हे समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळील आहे, अखिलेश यादव यांच्या उपस्थित त्यांनी एक महिन्यापूर्वी लखनौ येथे समाजवादी नावाचे अत्तर लॉन्च केले होते. 



महत्त्वाच्या इतर बातम्या :