Kanjhawala Case : माणुसकीला काळिमा! माहीत असतानाही अंजलीच्या मृतदेहाला 12 किमीपर्यंत फरफटत नेलं, आरोपींची कबुली
Kanjhawala Case : राजधानी दिल्लीच्या कंझावाला प्रकरणात आरोपींची कबुली दिली असून मृतदेह अडकल्याचं माहिती होतं. पण भीतीमुळे काढला नसल्याचं आरोपींनी म्हटलं आहे.
Kanjhawala Case : राजधानी दिल्लीच्या कंझावाला प्रकरणातील (Kanjhawala Murder Case) आरोपींनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्यात. या प्रकरणात आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांमधील (Delhi Police) सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीच्या खाली अंजलीचा मृतदेह अडकल्याचं माहिती होतं. पण भीतीमुळे काढला नसल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडी चालवताना आरोपींना मृतदेह गाडीच्या खाली आल्याचं समजलं होतं. पण बॉडी काढताना कुणी पाहिलं तर आपल्यालाच गुन्हेगार समजतील, या भीतीमुळे आरोपींनी गाडी थांबवली नाही. बॉडी आपोआप गाडीखालून निघून जाईल, असं आरोपींना वाटलं होतं. पण बारा किमीपर्यंत अंजलीची बॉडी फरफटत राहिली.
म्हणजेच, गाडीत असणाऱ्या आरोपींना त्यांच्या गाडीखाली मृतदेह लटकत असल्याची चांगलीच कल्पना होती. पण या प्रकरणात अडकण्याच्या भीतीमुळे त्यांनी मृतदेह कित्येक किलोमीटरपर्यंत ओढून नेणं योग्य मानलं जातं. आरोपींनी स्वतः पोलिसांसमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे लोकांचा रोष वाढतच चालला आहे. माहित असतानाही अंजलीला वाचवलं का नाही? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
अंकुश खन्नाला जामीन
कंझावाला प्रकरणातील (Kanjhawala Murder Case) आरोपी अंकुश खन्ना यांना दिल्लीच्या कोर्टानं जामीन दिलाय. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट सान्या दलाल यांनी अंकुश खन्ना याचा जामीन मंजूर केला. आत्मसमर्पण करणाऱ्या खन्नावरील आरोप जामीनपात्र असल्याचे निरीक्षण कोर्टानं नोंदवले. त्यामुळे आरोपी अंकुश खन्ना याला वीस हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन दिला.
प्रकरण नेमकं काय?
मद्यधुंद अवस्थेत असलेले पाच आरोपी कारमधून नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जात होते. त्यांच्या कारखाली येऊन एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर दिल्लीत खळबळ पसरली. ही घटना सुलतानपुरी येथील आहे. कार आणि स्कुटीची धडक झाल्यानंतर तरुणी गाडीखाली आली आणि कारनं तिला कंझावालापर्यंत फरफटत नेलं. हा अपघात एवढा भीषण होता की यावेळी मुलीचे सर्व कपडे फाटले. पोलिसांना तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांना एवढा मोठा अपघात झाल्याचेही कळले नाही, असं आरोपींनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :