एक्स्प्लोर

कन्हैया कुमार 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार!

महाआघाडीतील आरजेडी, काँग्रेस, जीतन राम मांझी यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस कन्हैय्या कुमारला बिहारमधील बेगूसराय या मतदारसंघात मदत करणार आहेत.

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु यूनिव्हर्सिटीच्या (जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार म्हणून 2019 ची लोकसभा निवडणूक लढणार आहे. महाआघाडीतील आरजेडी, काँग्रेस, जीतन राम मांझी यांचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस कन्हैय्या कुमारला बिहारमधील बेगूसराय या मतदारसंघात मदत करणार आहेत. कन्हैय्या कुमारने 2019 ची लोकसभा निवडणूक बेगूसराय मतदारसंघातून लढावी, अशी डाव्या पक्षांची इच्छा असल्याचं सीपीआयचे राज्य सचिव सत्यनारायण सिंह यांनी सांगितलं. काँग्रेस आणि आरजेडीसह इतर पक्षांचाही कन्हैय्या कुमारला पाठिंबा आहे, असं ते म्हणाले. सीपीआयने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये सहा जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय इतर मित्र पक्षांशी चर्चा करुन घेतला जाईल. ज्या सहा जागांवर उमेदवार देण्याची इच्छा आहे, त्यामध्ये बेगूसराय, मधुबनी, मोतीहारी, खगरिया, गया आणि बांका यांचा समावेश आहे, अशी माहिती सत्यनारायण सिंह यांनी दिली. दरम्यान, कन्हैय्या कुमारही लोकसभा निवडणूक लढण्यास तयार असल्याचं सत्यनारायण सिंह यांनी सांगितलं. महाआघाडीतील घटक पक्ष आरजेडी, काँग्रेस, डावे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं कन्हैय्या कुमारला समर्थन असेल, असंही त्यांनी सांगितलं. कन्हैय्या बिहारमधील बेगूसराय जिल्ह्यातील  बरौनी प्रखंड अंतर्गत बिहट पंचायत क्षेत्रातील रहिवासी आहे. त्याची आई अंगणवाडी सेविका, तर वडील शेतकरी आहेत. एकेकाळी डाव्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बेगूसरायमध्ये सध्या भाजपचे वरिष्ठ नेते भोला सिंह खासदार आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर आरजेडीचे उमेदवार तनवीर हसन दुसऱ्या आणि सीपीआयचे राजेंद्र प्रसाद सिंह जेडीयूच्या समर्थनाने तिसऱ्या क्रमांकावर होते.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
Sanjay Raut on Amit Shah: 'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
'अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय'; संजय राऊतांचा सनसनाटी दावा
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Embed widget