एक्स्प्लोर

कोर्टाच्या अवमान प्रकरणी सुनावणीला जस्टिस कर्नान यांची दांडी

नवी दिल्ली : कोलकाता हायकोर्टाचे जस्टीस सी एस कर्नन यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात हजेरी लावली नाही. सुप्रीम कोर्टाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांना तीन आठवड्यांची मुदत देऊन 10 मार्चपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. जस्टीस कर्नन यांच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा आरोप आहे. 8 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने कर्नन यांना नोटीस बजावून स्वतः हजेरी लावण्याचे आणि आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले होते. कोर्टाच्या इतिहासात पहिल्यांदाच हायकोर्टाच्या जजवर अशाप्रकारची कारवाई होत आहे. कर्नन यांनी सोमवारी सुप्रीम कोर्टात हजेरी न लावल्याने त्यांना तीन आठवड्यांची मुदत देऊन 10 मार्चपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. मात्र पुढच्या सुनावणीलाही कर्नन यांनी आपली बाजू मांडली नाही, तर सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही, असं कोर्टाने बजावलं आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रामुळे जस्टिस कर्नन यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या पत्रात 20 न्यायाधीशांच्या नावांचा उल्लेख करत ते भ्रष्ट असल्याचा आरोप कर्नन यांनी केला आहे. यापूर्वीही अनेक कारणांमुळे कर्नन यांनी वाद ओढवून घेतला होता. मद्रास हायकोर्टात झालेल्या स्वतःच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिल्याने, तसंच हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना कोर्टाच्या अवमानाचा खटला चालवण्याची धमकी दिल्याने ते चर्चेत होते. जस्टिस कर्नन यांनी सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रारला पत्र लिहून आपल्यावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. आपण दलित समाजाचे असल्यामुळे त्रास दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जे एस खेहर यांच्या मनात आपल्याविषयी पूर्वग्रह असल्याचं सांगत हे प्रकरण संसदेकडे पाठवण्याची मागणी त्यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टात सोमवारी झालेल्या सुनावणीत अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी जस्टिस कर्नन यांचं नवं पत्र वाचून दाखवलं. 'जस्टिस कर्नन वारंवार न्यायव्यवस्थेबाबत अपमानजनक परिस्थिती निर्माण करत आहेत. आज नोटीस पाठवूनही ते कोर्टात हजर राहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर अवमानाचा आरोप लावण्याची कारवाई सुरु करण्यात येत आहे.' मात्र खंडपीठाच्या अध्यक्षांनी नरमाईची भूमिका घेत त्यांना तीन आठवड्यांची मुदत दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget