तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबी अन् माशांच्या तेलाचे अंश सापडल्याच्या वादात केंद्रीय मंत्र्यांची उडी, वेगळा अँगल सांगितला, म्हणाले...
Tirupati Laddu : तिरुपती बालाजी येथे प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये चरबी आणि माशांच्या तेलाचा अंश सापडले असल्याचा आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता.
नवी दिल्ली :तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये चरबी आणि माशांच्या तेलाचे अंश आढळल्याचे आरोप करण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. आध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी यासंदर्भात आरोप केले होते. टीडीपीच्या प्रवक्त्यांनी त्यानंतर प्रयोगशाळेच्या अहवालाचा दाखला देत आरोप केले होते. तर, आंध्र प्रदेशातील विरोधी पक्ष असलेल्या वायएसआर काँग्रेसनं हायकोर्टात धाव घेतली. तर, प्रसादासाठी लाडूंचा पुरवठा करणाऱ्या कंपनीनं आरोप फेटाळले आहेत. या सर्व प्रकरणात आता केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी देखील उडी घेतली आहे. माझी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची माहणी केली आहे.
केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. व्यापाराच्या दृष्टीकोणातून कोणीही काहीही बोलतं. साधारणपणं बाजारात असं ऐकायला मिळतं की एखाद्या वस्तूमध्ये हे घटक आढळलेत असं म्हटलं की त्या वस्तूची मागणी घटते. या प्रकारच्या गोष्टी स्पर्धकांकडून केल्या जातात. तिरुपतीमध्ये काही लोकांनी असा प्रकार केल्याची शक्यता असल्याचं मांझी म्हणाले.
तिरुपती बालाजीची संपत्ती अधिक आहे. याशिवाय राम मंदिरात त्यांनी कित्येक टन लाडूंचं वाटप केलं होतं. तिरुपती येथे प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूची लोकप्रयिता वाढू लागली असेल त्यामुळं त्याला रोखण्यासाठी असं केलेलं असू शकतं, असं देखील जीतनराम मांजी म्हणाले. या प्रकरणी योग्य प्रकारे चौकशी केली जावी, असंही मांझी म्हणाले.
जीतनराम मांझी यांनी बिहारच्या नवादा येथील महादलित कुटुंबांच्या घरांच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी बोलताना मांझी यांनी यामागं राजदचा हात असल्याचा आरोप केला. महादलितांच्या जमीनीवर आरजेडीचे लोक कब्जा करतात आणि कमी किमतीत जमीन खरेदी करतात, असं मांझी यांनी म्हटलं. नवादामध्ये महादलित लोक त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत, त्या जागेबाबत केस सुरु आहे, त्यात पराभव होईल, असं वाटल्यानं आग लावली असावी अशी शक्यता मांझी यांनी व्यक्त केली.
जीतनराम मांझी पुढं म्हणाले की बिहारमध्ये अशा 100 घटना घडल्या तर त्यामधील 70 घटनांमागे राजदचे लोक असल्याची बाब समोर येते. आम्ही विधानसभेत या प्रकरणी आयोग नियुक्त करुन चौकशी करण्याची मागणी केली आहे, असंही मांझी म्हणाले.
इतर बातम्या :