Operation Mahadev : श्रीनगरमध्ये भारतीय सैन्याकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान; श्रावणी सोमवारी राबवलेल्या 'ऑपरेशन महादेव'ला मोठं यश!
Operation Mahadev : श्रीनगरमध्ये भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दहशतवादी कट उधळून लावला आहे. दहशतवाद्यांमध्ये झालेल्या या चकमकीत तिघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश आले आहे.

Operation Mahadev श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधून एका मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय सैन्याने पुन्हा एकदा दहशतवादी कट उधळून लावला आहे. श्रावणी सोमवारी (28 जुलै) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या मोठ्या चकमकीत तिघा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश आले आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार या चकमकीत पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा हि खात्मा करण्यात आला असून सुलेमान आणि यासीर असे या दोन दहशतवाद्यांचे नाव आहे.
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा हि खात्मा
विशेष म्हणजे दहशतवाद्यांच्या विरोधातराबवलेल्या या मोहिमेला भारतीय सैन्याने 'ऑपरेशन महादेव' (Operation Mahadev) असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान लष्कराच्या 'चिनार कॉर्प्स'ने 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे ही माहिती शेअर केली. एकीकडे लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर आज (28 जुलै ) आज आणि उद्या विशेष चर्चा सुरु आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून या चर्चेला सुरुवात झाली असताना हि मोठी बातमी समोर आली आहे.
पहलगाममधील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने आतापर्यंत अनेक दहशतवाद्यांना ठार मारत दहशतवाद्यांच्या आकांचे कंबरडं मोडलं आहे. मात्र अद्यापहि पाकड्यांची खोड मुडली नसल्याचे पुढे आले आहे. अशातच कंठस्नान घातलेले तिघा पैकी दोन अतिरेकी पहलगाम हल्ल्यातील (Pahalgam Terror Attack) संशयित असल्याची माहिती पुढे आली आहे. अशातच या कारवाईचा तपशील भारतीय सैन्याकडून मिळाल्यावर अधिक माहिती कळू शकणार आहे.
OP MAHADEV - Update
— Chinar Corps🍁 - Indian Army (@ChinarcorpsIA) July 28, 2025
Three terrorist have been neutralised in an intense firefight. Operation Continues.#Kashmir@adgpi@NorthernComd_IA pic.twitter.com/5LToapGKuf
दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त
सेनेने महादेव टेकडीवर एक छावणी उभारली आहे, ज्याद्वारे या भागातील हालचालींवर लक्ष ठेवले जाते. दहशतवादी मुसाच्या हालचाली येथे बऱ्याच काळापूर्वी दिसल्या होत्या. म्हणूनच शोध मोहीम सुरू होती. सैन्यासोबत जम्मू-काश्मीर पोलिसही या कारवाईत सहभागी होते. सैन्याने ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये ज्या ठिकाणी चकमक झाली ती जागा टेकडीवर आहे.
दहशतवाद्यांचे तंबूत होतं वास्तव्य
दहशतवाद्यांनी महादेव टेकडीच्या परिसरात तंबू उभारले होते आणि ते या ठिकाणी राहत होते. सध्या सैन्य हे दहशतवादी कुठून आले आणि ते कोणत्या संघटनेशी संबंधित होते याचा शोध घेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Operation Sindoor: संसदेत आज ऑपरेशन सिंदूरवर 16 तास चर्चा; राजनाथ सिंह चर्चेला सुरुवात करतील,ट्रम्प यांच्या युद्धबंदीच्या दाव्यावर पंतप्रधान मौन सोडणार?
- पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राहुल गांधी एका महिन्यात दुसऱ्यांदा काश्मीरमध्ये; पूँछमध्ये पाकिस्तानी गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांची घेतली भेट























