एक्स्प्लोर
Advertisement
जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, दहा जखमी
अनंतनागमध्ये कडेकोटा सुरक्षाव्यवस्था असलेल्या परिसराबाहेर सुरक्षा गस्ती दलावर सकाळी अकराच्या सुमारास ग्रेनेड फेकण्यात आला
अनंतनाग : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला झाला. डीसी कार्यालयाबाहेर नागरिकांच्या गर्दीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला. या हल्ल्यात दहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये वाहतूक पोलिस आणि एका पत्रकाराचाही समावेश आहे. हल्लेखोर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांचं सर्च ऑपरेशन सुरु आहे.
सकाळी 11 वाजता ग्रेनेडचा हल्ला
"अनंतनागमध्ये कडेकोटा सुरक्षाव्यवस्था असलेल्या परिसराबाहेर सुरक्षा गस्ती दलावर सकाळी अकराच्या सुमारास ग्रेनेड फेकण्यात आला. पण निशाणा चुकल्याने तो रस्त्याजवळच फुटला. यावेळी तिथून जाणारे जवळपास दहा जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत," असं एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.
दहशतवाद्यांचा शोध सुरु
हल्ल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परिसराला वेढा घालून दहशतवाद्यांचा शोध सुरु केला आहे. आतापर्यंत कोणत्याही अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement