एक्स्प्लोर
काश्मिरमध्ये भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळी झाडून हत्या
दक्षिण काश्मिरमधील नौगाममध्ये गुल मोहम्मद मीर यांची संशयित दहशतवाद्यांनी राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या केली.
![काश्मिरमध्ये भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळी झाडून हत्या Jammu Kashmir BJP leader Gul Mohammed Mir shot dead by suspected militants काश्मिरमध्ये भाजप नेत्याची दहशतवाद्यांकडून गोळी झाडून हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/08082044/BJP.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
श्रीनगर : जम्मू काश्मिरमधील भाजप नेते गुल मोहम्मद मीर यांची संशयित दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. छातीत तीन, तर पोटात दोन गोळ्या लागल्यामुळे मीर यांचा मृत्यू झाला.
देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होत असताना काश्मिरमध्ये राजकीय नेत्याच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे.
दक्षिण काश्मिरमधील नौगाममध्ये काल (शनिवारी) संध्याकाळी मीर यांच्या राहत्या घरी हल्ला झाला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या मीर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
60 वर्षीय गुल मोहम्मद मीर हे जम्मू काश्मिरमधील अनंतनाग जिल्ह्याचे भाजप उपाध्यक्ष होते. त्यांनी जम्मू काश्मिर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. हत्याकांडानंतर पोलिसांनी नौगाम परिसरातील सुरक्षा वाढवली आहे.
जम्मू काश्मिरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते अनिल परिहार आणि त्यांच्या भावाची हत्या झाली होती. तर 9 एप्रिलला रा. स्व. संघाच्या एका नेत्याचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
महाराष्ट्र
शिक्षण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)