एक्स्प्लोर
जम्मू-काश्मीर : शोपियन, अनंतनागमध्ये एन्काऊंटर, 11 दहशतवाद्यांचा खात्मा
शोपियनमध्ये दोन ठिकाणच्या चकमकीत 10, तर अनंतनागमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलं. रात्रीपासून ही चकमक सुरु आहे.
![जम्मू-काश्मीर : शोपियन, अनंतनागमध्ये एन्काऊंटर, 11 दहशतवाद्यांचा खात्मा jammu Kashmir anantnag shopian encounter security forces terrorist killed जम्मू-काश्मीर : शोपियन, अनंतनागमध्ये एन्काऊंटर, 11 दहशतवाद्यांचा खात्मा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/01124206/shopian.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या शोपियन आणि अनंतनागमध्ये तीन चकमकींमध्ये सुरक्षा यंत्रणांनी टॉप कमांडरसह अकरा दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये लष्कराचे तीन जवानही जखमी झाले. अगोदर अनंतनागमध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला आणि एकाला ताब्यात घेतलं. या दशहतवाद्याची चौकशी सुरु आहे.
अनंतनागच्या पेठ दियालगाम भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. सुरक्षा यंत्रणांनी या भागाचा ताबा घेत शोधमोहिम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा यंत्रणांवर गोळीबारही करण्यात आला, पोलिसांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आणि कारवाई केली, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
शोपियन एन्काऊंटर
शोपियनमध्ये सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये दोन ठिकाणी रात्री उशीरा चकमक झाली. द्रागाद भागात सुरक्षा यंत्रणांनी 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर कचदुरा भागातही तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. दक्षिण शोपियनमधील चकमकीत एका नागरिकाचाही मूत्यू झाल्याची माहिती आहे.
काश्मीर खोऱ्यात ट्रेन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)