Jagannath Rath Yatra 2022 : कडेकोट बंदोबस्तात पुरी रथयात्रेला सुरुवात, रथयात्रेत लाखो भाविक होणार सहभागी!
Jagannath Rath Yatra 2022 : जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही रथयात्रा 1 जुलैपासून सुरु होऊन, 12 जुलैपर्यंत चालणार आहे.

Jagannath Rath Yatra 2022 : जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. ही रथयात्रा 1 जुलैपासून सुरु होऊन, 12 जुलैपर्यंत चालणार आहे. ओडिशातील पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेसाठी (Jagannath Rath Yatra 2022) पूजा विधी सुरु झाले आहेत. कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर यंदा भाविकांना थेट रथयात्रेत सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. पुरी मंदिर ते रथयात्रा मार्ग आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी सध्या कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यात्रेतील प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तब्बल दोन वर्षांनी या यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने या ठिकाणी लाखोंची गर्दी जमणार आहे.
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सकाळी 'पहिंद विधि' केला. या विधीमध्ये रथयात्रा सुरू होण्यापूर्वी सोन्याचा झाडूने रथ साफ केला जातो. त्यानंतर भगवान जगन्नाथ, त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचा रथ जमालपूर परिसरातील 400 वर्ष जुन्या जगन्नाथ मंदिरातून वार्षिक यात्रेसाठी रवाना होतो.
रथयात्रे मागचं कारण काय?
पुराण कथेनुसार भगवान जगन्नाथाच्या बहिणीने एकदा नगर पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मग, जगन्नाथजी आणि त्यांचे भाऊ बलभद्र, बहीण सुभद्राला घेऊन या रथावर विराजमान झाले आणि नगर पाहण्यास निघाले. यादरम्यान ते त्यांच्या मावशीच्या घरी गुंडीचा येथेही गेले आणि सात दिवस राहिले. तेव्हापासून येथे रथयात्रा काढण्याची परंपरा सुरु झाली. या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्या मूर्ती भव्य रथांवर स्वार होतात. यामध्ये पहिला रथ भगवान जगन्नाथ, दुसरा भाऊ बलराम आणि तिसरा बहीण सुभद्रा यांचा असतो. लाखो भाविक या यात्रेत सहभागी होऊन, हा रथ खेचून देवाची सेवा करतात.
अहमदाबादमध्ये भगवान जगन्नाथाची 145वी यात्रा!
जगन्नाथ पुरीप्रमाणेच अहमदाबादमध्येही भगवान जगन्नाथांची 145वी रथयात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेत भगवान जगन्नाथ, त्यांची बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासह शनिवारी नगर यात्रेला रवाना होणार आहेत. जुन्या अहमदाबादमध्ये होणारी ही नगर यात्रा 19 किलोमीटरची असेल. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे रथयात्रेत प्रथमस्थानी 17 हत्ती, 101 ट्रक सहभागी होतात.
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
